जेथे परिवार संवाद तेथे कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:19+5:302021-02-20T04:44:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत कमी प्रभाव असलेल्या कोरोना संसर्गाचा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात विस्फोट झाला आहे. यात ...

Increasing prevalence of cornea where family interaction | जेथे परिवार संवाद तेथे कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव

जेथे परिवार संवाद तेथे कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत कमी प्रभाव असलेल्या कोरोना संसर्गाचा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात विस्फोट झाला आहे. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्या ज्या भागात परिवार संवाद यात्रा घेतली. त्या त्या भागात १५ फेब्रुवारीपासून मोठी रुग्णवाढ समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णसंख्येत याच तालुक्यांचा मोठा वाटा असल्याचे गंभीर चित्र आहे.

जयंत पाटील बाधित आढळून आल्याने हजारो लोकांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. जळगाव शहरात प्रचंड गर्दीत राष्ट्रवादीचे कार्यक्रम पार पडले. विशेष म्हणजे व्यासपीठावर कोणीच मास्क परिधान केले नसल्याचे गंभीर चित्र होते. जळगाव शहरात गेल्या चार दिवसात १९३ तर चाळीसावात १५ फेब्रुवारीपासून ६९ रुग्ण आढळून आले आहेत. याआधी या तालुक्यात रोज दोन ते तीन रुग्ण आढळत होते. तीच संख्या १५ पासून २८, २३ वर पोहोचली आहे.

तज्ञ काय सांगतात?

बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर पहिले ७ ते १० दिवसांच्या कालावधीत संबंधिताला लक्षणे येऊ शकतात. याला कोरोनाचा इन्क्युबेशन पिरिएड म्हणतात. मात्र, सर्वांनाच लक्षणे येतील असे नाही, ज्यांची प्रतिकारक्षमता कमी त्यांना सहसा ही लक्षणे जाणवतील, अन्यथा लक्षणे जाणवणारही नाही, त्यामुळे ही बाब अत्यंत धोकादायक असते. असे औषध वैद्यक शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.

ठिकाण १० फेबुवारी ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८

चाळीसगाव : ०३ ०२ ०४ ०६ ०० २८ १० ०८ २३

अमळनेर: ०० ०१ ०० ०० ०० १२ ०३ ०२ ०५

पारोळा ०९ ०१ ०० ०१ ०३ ०५ ०४ ०३ ०७

पाचोरा ०१ ०० ०१ ०२ ०० ०४ ०० ०१ ०१

जामनेर ०० ०० ०१ ०२ ०० ०३ ०१ ०१ ०६

१२ फेब्रुवारी १३ १४ १५ १६ १७ १८

चोपडा ०१ ०० ०० १२ ०२ ०५ ०४

फैजपूर ०० ०० ०० ०२ ०० ०० ०३

भुसावळ ०२ ०४ ०४ ०१ ०२ ०९ १२

मुक्ताईनगर ०० ०० ०० ०० ०२ ०० १०

ठिकाण १३ फेब्रुवारी १४ १५ १६ १७ १८

जळगाव : ४६ ०८ ४५ २९ ३५ ८४

Web Title: Increasing prevalence of cornea where family interaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.