महिलांच्या सरासरी मतदानात वाढ

By admin | Published: February 17, 2017 11:35 PM2017-02-17T23:35:03+5:302017-02-17T23:35:03+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : 6 लाख 35 हजार महिलांनी बजावला हक्क

Increasing women's average voting | महिलांच्या सरासरी मतदानात वाढ

महिलांच्या सरासरी मतदानात वाढ

Next

जळगाव : ‘चूल आणि मूल’ यामध्ये अडकलेल्या महिला समर्थपणे आपल्या हिताचा निर्णय घेऊ लागल्या आहेत. गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाभरातील 6 लाख 35 हजार 455 महिलांनी स्वत:हून पुढे येत गट आणि गणाचे प्रतिनिधित्व करणा:या उमेदवारांना मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या सरासरी मतदानात वाढ दिसून आली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान झाले. सकाळपासून महिला मतदारांचा मोठा उत्साह होता.
चाळीसगावात व जामनेरात सर्वाधिक मतदान
महिला मतदारांचा सर्वाधिक उत्साह हा जामनेर व चाळीसगाव तालुक्यात होता. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 70 हजार 173, तर जामनेर तालुक्यात 67 हजार 996 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
साडेअकरानंतर महिला मतदान केंद्रावर
सकाळी घरातील धुणे, भांडी, स्वयंपाकाची कामे महिलांना करावी लागत असल्याने सकाळी साडेसात ते साडेअकरा यादरम्यान जिल्हाभरात केवळ 61 हजार 427 महिलांनी मतदान केले होते. त्यानंतर घरातील बहुतांश कामे आटोपल्यानंतर 12 वाजेच्या सुमारास महिलांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली. 11.30 वाजेर्पयत 1 लाख 85 हजार 77, तर दुपारी 1.30 र्पयत तीन लाख 27 हजार 12 महिलांनी मतदान केले. दुपारी साडेतीन वाजेर्पयत 4 लाख 93 हजार 736 महिलांनी मतदान केले.
भुसावळ, भडगावमध्ये अनास्था
अन्य तालुक्यांच्या तुलनेत भुसावळ व भडगावमधील महिलांमध्ये मतदानाबाबत काही प्रमाणात उत्साह कमी दिसून आला. भुसावळ तालुक्यातील 48 हजार 973 महिला मतदारांपैकी केवळ 24 हजार 492 महिला मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांर्पयत आहे. भडगावमध्येदेखील काही प्रमाणात कमी उत्साह दिसून आला.
तालुकानिहाय मतदानाची स्थिती
तालुका    स्त्री मतदार        मतदान
चोपडा    82817        51318
यावल    69072        41443
रावेर    86296        57438
मुक्ताईनगर    57909       36465
बोदवड    23754       15626
भुसावळ    48973       24492
जळगाव    78462       51791
धरणगाव    48881      31495
अमळनेर    73427      43187
पारोळा    58902      37886
एरंडोल    45027      27917
जामनेर    105850       67966
पाचोरा    81338       49748
भडगाव    46678       28520
चाळीसगाव    114715       70173
एकूण     1022101       635455

Web Title: Increasing women's average voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.