इनक्युबेशन केंद्राच्या लोगो, टॅगलाईनसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:08+5:302021-06-16T04:24:08+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजसद्वारा (केसीआयआयएल) या केंद्रासाठी लोगो व ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजसद्वारा (केसीआयआयएल) या केंद्रासाठी लोगो व टॅगलाईन डिझाइन करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकास पाच हजार रूपये व प्रशस्तीपत्र तर द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धक लोगो व टॅगलाईन पैकी एक किंवा दोन्हीही बनवू शकतात. स्पर्धेत सार्वजनिक एजन्सीज, व्यक्ती, विद्यार्थी आणि लोकसमुदाय भाग घेऊ शकतील. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३० जून असून स्पर्धेबाबतचे सर्व नियम व अटींची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच केसीआयआयएलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे केसीआयआयएलचे संचालक प्रा.डॉ. भूषण चौधरी व डॉ. विकास गिते यांनी कळविले आहे.