शेतकरी संघटनेच्या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:23+5:302021-07-03T04:12:23+5:30
शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४, ...
शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४, ५ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यात माधव शिंदे यांच्या पिकाचेही नुकसान झाले. हे प्रकरण गावात मिटण्यासारखे नाही असे दिसताच माधव शिंदे व इतर शेतकरी तक्रार नोंदविण्यासाठी दैठणा पोलीस स्टेशन, ता. जि. परभणी येथे गेले. सर्व शेतकऱ्यांनी आपापले तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर झेरॉक्स प्रतीवर पोहोच मागितली. याचा राग येऊन ड्यूटीवर असलेला पोलीस बळीराम मुंडे याने माधव शिंदे यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की व मारहाण केली.
याप्रश्नी राज्यातील सर्व तालुक्यातील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत असून, राज्यभरातील शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी तहसीलदार गवांदे व पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिली आहे. निवेदन देताना सचिन भिला पाटील, शेतकरी बाळू नाना पाटील व भीम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे उपस्थित होते.