विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र ओपीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:32+5:302020-12-30T04:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या स्क्रिनिंगसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याचे नियोजन सुरू केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या स्क्रिनिंगसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. येत्या दोन दिवसात ही ओपीडी सुरू होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू झाली. मात्र,या ठिकाणीच एकत्रित तपासणी केली जात होती. विदेशातून आलेल्या नागिरकांची पण त्याच ठिकाणी तपासणी होत होती. मात्र, विदेशातून येणाऱ्यांवर आता विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना असल्याने शिवाय त्यांची संख्या हळू- हळू वाढत असल्याने सी २ या कक्षांमध्ये ही ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी थर्मल गनने तापमान मोजणे, ऑक्सिजनची पातळी मोजणे, आणि लक्षणे विचारणे याची तपासणी केली जाणार आहे. गरज भासल्यास संबधिताची आरटीपीसीआर चाचणी होणार आहे.