जळगावात भारत बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:45+5:302020-12-09T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील दाणा बाजार, फुले मार्केटसह संपुर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद होती. काही दुकानदारांनी सकाळी दुकाने उघडली होती. मात्र काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले त्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील दुकाने बंद ठेवली.
शेतकऱ्यांनी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्या बंद मध्ये विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.
केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी
सकाळी ११ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उपस्थितांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, लोकसंघर्ष समितीचे प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, मुफ्ती हारून, फारुक शेख, माजी आमदार मनीष जैन, वाल्मीक पाटील, संजय पवार, विजय पाटील, नंदू पाटील, महिला सर्वपक्षीय प्रतिनिधी कल्पना पाटील,अरुणा पाटील सरिता माळी, मंगला बारी, ज्योती शिवदे, योगिता शुक्ला यांनी सहभाग नोंदविला.
इतर भागात व्यवहार सुरळीत
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुख्य बाजारपेठेत जरी बंद पाळला असला तरी गणेश कॉलनी, महाबळ कॉलनी, गिरणा टाकी परिसरात दुपारनंतर व्यवहार सुरळीत होते. रिंग रोड परिसरातील बहुतांश दुकाने मात्र दिवसभर बंदच होती.
सुभाष चौकात शेतकरी कायद्याची होळी
मणियार बिरादरीने सुभाष चौकात शेतकरी कायद्याच्या प्रतीची होळी केली आहे. यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, वाल्मिक पाटील, रईस बागवान, जमील शेख , झिया बागवान, फारूक कादरी, फहिम पटेल, सैयद शाहिद, अब्दुल रउफ, हरीश सय्यद, मोहसीन युसूफ, मुजाहिद खान,अख्तर शेख, रफिक शेख उपस्थित होते.
प्रतिभा शिंदे व कुमार चिंथा यांच्यात शाब्दिक वाद
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह विविध संघटनाच्या पदाधिकार्यांकडून बंदचे आवाहन केले जात होते. या दरम्यान प्रतिभा शिंदे व कुमार चिंथा यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाला.