हुतात्मा दिनी भारत दोन मिनिटे होणार स्तब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:59 AM2020-01-28T10:59:39+5:302020-01-28T11:13:43+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली
संजय पाटील
अमळनेर, जि. जळगाव - देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून संपूर्ण देशभरातील शासकीय कार्यालयात मौन बाळगून शांतता पाळली जाणार आहे.
केंद्रशासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र्र शासनाचे उपसचिव ज जि वळवी यांनी पत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयात आणि सर्वसामान्य नागरिकांनी 30 रोजी 11 वाजता 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी 10 वाजून 59 मिनिटांपासून ते 11 वाजेपर्यंत एक मिनिटं भोंगा वाजवून इशारा दिला जाणार आहे. 2 मिनिटे मौन संपल्यांनंतर पुन्हा एक मिनिट भोंगा वाजवून पुन्हा मौन संपल्याचा इशारा देण्यात येणार आहे. जिथे भोंग्याची व्यवस्था नसेल तिथे योग्य ते निर्देश देऊन हुतात्म्यांना गंभीरपणे आदरांजली द्यावी असेही पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त
...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा
China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव
कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे
कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे