भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य चिरकाल टिकणारे - कथ्थक नृत्य गुुरु डॉ.पुरु दाधीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:59 PM2019-08-04T12:59:02+5:302019-08-04T12:59:21+5:30
पाश्चात नृत्य येत-जात राहतील
अजय पाटील
गेल्या काही वर्षांमध्ये युवकांचा कल कथ्थक, भरतनाट्यम, कथ्थकली अशा भारतीय नृत्यांकडे वाढत आहे. पाश्चात नृत्य हे जरी युवकांना आवडत असले तरी ते चिरकाळ टीकणारे नाही, काही दशकांमध्ये पाश्चात्य नृत्यात अनेक बदल होवून काही नृत्य प्रकार नामशेष देखील झाले. मात्र, भारतीय संगीत व नृत्य पुरातन काळापासून सुरु असून ते आजही कायम आहे, असे मत कथ्थक नृत्य गुुरु डॉ.पुरु दाधीच (इंदूर) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
कथ्थक कलावंत अर्पणा भट- कासार यांनी रविवारी आयोजित केलेल्या कथ्थक नृत्य कार्यक्रमासाठी डॉ.दाधीच हे शनिवारी सायंकाळी जळगावात दाखल झाले. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ.विभा दाधीच, अपर्णा भट्ट उपस्थित होत्या.
प्रश्न : कथ्थक नृत्यप्रकार भारतात कसा आला?
उत्तर : बाराव्या शतकापर्यंत भारतातील नृत्य व संगीत एकच होते. मात्र, अरबी आक्रमणानंतर भारतीय संगीत देशातील वेगवेळ्या क्षेत्रात विखरले. कथ्थक नृत्यप्रक ार मात्र बंगालपासून पाकिस्तान, कश्मिरपासून आंध्रप्रदेशपर्यंत पसरलेला आहे. अनेक शतकांपासून कथ्थक ने आपले वेगळे स्थान भारतीय नृत्यप्रकारात निर्माण केले असून, पाश्चिमात्य नृत्यामुळे कथ्थकला कोणताही धोका नाही.
प्रश्न : युवकांना कथ्थक नृत्याबद्दल जास्त माहिती नाही?
उत्तर : आजच्या युवकांना कथ्थकमध्ये रस नाही असा आरोप केला जातो. मात्र, माझ्यामते आजच्या काळात कथ्थक शिकण्यासाठी युवकांमध्ये जी आवड दिसून येत आहे, तितकी आवड कोणत्याही काळात पहायला मिळाली नाही. आता सीबीएई च्या शाळांमध्ये भारतीय नृत्य प्रकार शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधीच्या काळात कथ्थक हे नृत्य काही घराण्यांपुरतेच मर्यादित होते. मात्र, आता कथ्थक आता प्रत्येकापर्यंत पोहचले असून, प्रत्येक शहरात युवक कथ्थकचे धडे घेत आहेत.
कथ्थकमध्ये करीअरच्या संधी
जर एखादी कला जर मनपासून शिकायची असेल तर कोणत्याही क्षेत्रात आपल्याला संधी उपलब्ध होत असतात. कथ्थकमध्ये करीअरच्या अनेक संधी आहेत. अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये कथ्थकच्या प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. कोरीओग्राफीमध्ये अनेक संधी आहेत. या व्यतिरिक्त क्लासेस देखील घेता येवू शकतात. अनेक ठिकाणी कथ्थकचे मोठ-मोठे कार्यक्रम होत असतात. कथ्थक नृत्य हे नेहमी पुरुष कलावंतांचे नृत्य असल्याचे समजले जाते. मात्र, काही वर्षांपासून पुरुष कलावंत कथ्थक पासून दुर जात असल्याची खंत आहे.
वयाच्या दहाव्या वर्षांपासून करत आहे कथ्थक नृत्य
डॉ. दाधीच हे इंदूर येथील मूळ रहिवासी असून कथ्थकमध्ये डॉक्टरेट मिळविणारे ते पहिलेच भारतीय आहेत. वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते कथ्थक नृत्य करत असून अनेक राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आले आहे.
कथ्थक शिकण्यासाठी युवकांमध्ये जी आवड दिसून येत आहे, ती कोणत्याही काळात पहायला मिळाली नाही.
- डॉ.पुरु दाधीच