देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:20 AM2017-01-13T00:20:07+5:302017-01-13T00:20:07+5:30

कुसुंबा शिवारातील घटना : एक लाख 60 हजार 80 रुपये किमतीच्या देशी तुपाचे 29 डबे लंपास

Indian truck driver 'robbed' | देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’

देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’

Next

रावेर : पाल ते रावेर या रस्त्यावरील खड्डय़ांच्या दैनावस्थेत खड्डे चुकवण्यासाठी कमी वेग झालेल्या ट्रक क्र.(जे.के.-21/4967) ची ताडपत्री व फट फाडून अज्ञात तीन चोरटय़ांनी धावत्या ट्रकमधून जीआरडी कंपनीचे प्रत्येकी 15 किलो वजन व पाच हजार 520 रुपये किंमत असलेले देशी तुपाचे 29 डबे असलेला एक लाख 60 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा ते लालमाती दरम्यान कुसुंबा शिवारातील  दर्गाहजवळ घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त कुसुंबा खु.।। येथे भवानी माता मंदिरात आज होत असलेल्या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला रस्तालुटीची ही घटना घडल्याने परिसरात एकच घबराहट पसरली आहे. याप्रकरणी  पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जम्मू जिल्ह्यातील कटवा येथील ट्रकमालक व चालक असलेले चंद्रशेखर ओमप्रकाश शर्मा (रा.तारानगर, हटेलीमोट, कटवा) हे त्यांच्या ट्रक (क्र.जे.के.21/4967) ने जम्मूहून बंगलोरच्या पुढे असलेल्या हाफर येथे जीआरडी कंपनीचे उत्पादन असलेले 15 किलो वजनाचे देशी तुपाचे डबे भरुन नेत होते. दरम्यान, पालकडून रावेरकडे येत असताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे खड्डे चुकवत त्यांच्या ट्रकचा वेग कमी होताच अज्ञात चोरटय़ांनी ट्रकवर चढून वरच्या बाजूने फट व ताडपत्री कापून प्रत्येकी 15 किलो वजन व किंमत पाच हजार 520 रुपये असलेले 29 डबे धावत्या ट्रकमधून लंपास केले.  सुमारे 41 क्विंटल 35 किलो वजनाचे एक लाख 60 हजार 80 रुपये किमतीचा देशी तुपाचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी लुटला. ही घटना बुधवारला रात्री 8.30 वाजेच्या सुमारास लालमाती-कुसुंबा दरम्यान कुसुंबा शिवारात असलेल्या दर्गाहजवळ घडली. पौष पौर्णिमेनिमित्त कुसुंबा खु.।। येथील श्री भवानी माता मंदिरात असलेल्या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी   पोलिसात चंद्रशेखर ओमप्रकाश शर्मा (रा.तारानगर कॉलनी, हटेलीमोर, कटवा, जि.जम्मू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार ज्ञानेश फडतरे हे करीत आहेत. (वार्ताहर)
खड्डय़ांमुळे  घडली घटना..
रावेर तालुक्यातील पाल-रावेर हा रस्ता अती खड्डेमय आहे.या खडय़ांवरुन तूप घेऊन जाणा:या ट्रकची गती अतिशय धीमे होती.याच संधीचा फायदा चोरटय़ांनी घेतला. मालट्रकवरील ताडपत्री फोडून त्यांनी ट्रकमधील एक लाख 60 हजार रुपये कितीचे 29 तुपाचे डबे लांबवून पलायन केले.या घटनेला केवळ रस्त्याची दुरवस्था कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Indian truck driver 'robbed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.