‘मोदींच्या कार्यकाळात भारतीय जास्त भयभीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:19 AM2020-01-06T05:19:06+5:302020-01-06T05:19:24+5:30
मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांपेक्षाही आताच्या कार्यकाळात भारतीय जनता जास्त भयभीत झाली आहे.
चुडामण बोरसे
जळगाव : मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांपेक्षाही आताच्या कार्यकाळात भारतीय जनता जास्त भयभीत झाली आहे. केंद्राने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे जनतेला त्रास देण्याचे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जळगावात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्या येथे आल्या होत्या. केंद्र सरकारला कामगार, शेतकरी, ओबीसी, अल्पसंख्याक, दलित ही रेषच पुसून टाकायची आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे डोळझाक करुन अन्य प्रश्न पुढे केले जात आहेत.
मूळात सीएए हा कायदा आणि एनआरसी आणि एनपीए ही विधेयके संविधान आणि राष्टÑवादाच्या विरोधात आहेत. देशात काय सुरू आहे. हे मी सांगण्याची गरज नाही.