हिंदी भाषेबाबत उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:25 PM2019-02-16T22:25:18+5:302019-02-16T22:25:25+5:30
राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी
चंद्रशेखर जोशी ।
हिंदी भाषेची ओळख ही राष्टÑ भाषा म्हणून आपण करतो. देशातील प्रत्येक प्रदेशात ही भाषा बोलली जाते. मात्र त्या दृष्टीने भाषेचा प्रचार व प्रसार होतो का, असा प्रश्न प्रश्न उपस्थित केला जातो व त्याचे उत्तर हे नकारात्मक येत असते.
महाराष्टÑ राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी (चिपळून ) हे नुकतेच जळगाव शहरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
प्रश्न: नेमके काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते ?
उत्तर: हिंदी विषय ऐच्छिक करण्याचा प्रयत्न राज्य शासन शालेय शिक्षणमंत्र्यांचा आहे. महाराष्टÑात हिंदी विषय इ.१ ली पासून १२ वीपर्यंत हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमात कायम ठेवावा. शिक्षण आयोगाने त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. महाराष्टÑ राज्य पुरोगामी असल्याने त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला आहे.
मराठी बरोबर हिंदी भाषा इ. १ ली पासून अभ्यासक्रमात ठेवण्याची मागणी महाराष्टÑ राज्य हिंदी शिक्षक महामंडळाची असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न: यासाठी काय प्रयत्न केले व त्याला यश कसे मिळाले?
उत्तर: इ.५ वीचा हिंदीचा विषय बंद करण्याचा प्रयत्न २०१२ साली राज्य शासनाने केली. परंतु महाराष्टÑ राज्य हिंदी महामंडळाने ५ लाख सह्यांचे निवेदन देवून ५ वीचे हिंदी वाचवून महाराष्टÑात ३० हजार हिंदी शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषयाला सापत्नपणाची वागणूक शासनाने दिली.
मराठीला ६ तासिका हिंदी भाषेला केवळ ३ तासीका, इंग्रजी विषयाला ८ तासिका परंतु महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाने समान भाषा समान गुण असावेत यासाठी महाराष्टÑातील १००० ग्रामपंचायतीचे हिंदी तास वाढविण्यासाठी ग्रामसभा प्रस्ताव, नगरपालिका, कार्पोरेशनचे नगराध्यक्ष, महापौर, खासदार, आमदार, मंत्री यांच्या ५ लाख सह्यांचे निवेदने सर्व संचालक, शालेय शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना देवून पुणे येथे लाक्षणिक उपोषण करुन शालेय अभ्यासक्रमात मराठी ६ तासिका, हिंदी ६ तासिका, इंग्लीश ६ तासिका करण्यात यश मिळाले.