इंदूर-अंकलेश्वर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:21 PM2017-10-11T17:21:32+5:302017-10-11T17:32:14+5:30
रावेर,दि.11 : इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे रावेरसह परीसरात संताप व्यक्त होत आहे.
ऑनलाईन लोकमत
रावेर,दि.11 : इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे रावेरसह परीसरात संताप व्यक्त होत आहे.
खोल खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत धरून या रस्त्यावरून मार्ग काढत आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंदूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दीड- दोन फूट खोल खड्डे असतांना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते बुजविले जात नाही.
पूर्वी या विभागाकडून राज्य मार्गाची डागडुजी केली जात होती. मात्र, खड्डे बुजविण्याच्या कामासाठी यावर्षापासून निविदा तयार करून कंत्राट देण्यात येणार आहे. त्या कामांवरील कर आकारणीमुळे कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली.
शिवसेनेतर्फे निदर्शने
बांधकाम विभागाच्या या कृतीबद्दल बुधवारी शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगिराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडीत, शहर प्रमुख नितीन महाजन, नितीन घोरपडे यांनी बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली.
राष्ट्रवादी काढणार 13 रोजी अंत्ययात्रा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते 13 रोजी राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण मार्गांची झालेली दुरवस्था, शेतमालाला दाम मिळत नसल्याने शेतक:यांची होणारी लूट, भारनियमनाचा जाचक बडगा या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारची अंत्ययात्रा काढणार आहे.