इंद्रप्रस्थनगरात कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून तीन लाखांचा ऐवज लांबविला
By admin | Published: May 29, 2017 01:30 AM2017-05-29T01:30:41+5:302017-05-29T01:30:41+5:30
चोरटय़ांचा नवा फंडा : कुटुंब घरात झोपलेले असताना झाली चोरी, पोलिसांना आव्हान
जळगाव : कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून चोरटय़ांनी हेमंत दत्तात्रय बडगुजर यांच्या घरातून दहा तोळे दागिने, 25 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना इंद्रप्रस्थनगरात रविवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरी झाली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपलेले होते. घरात गार हवा येण्यासाठी बडगुजर यांनी फक्त लोखंडी दरवाजालाच कुलूप लावले होते. चोरटय़ांनी हे कुलूप उघडून घरात प्रवेश केला व दुस:या खोलीत असलेल्या कुलरमध्ये गुंगीचे औषध फवारले. चोरटय़ांचा हा नवा फंडा ऐकून घरमालक व पोलीसही चक्रावले आहेत.
गेल्या 15 दिवसांपासून चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून एकापाठोपाठ चो:या, घरफोडय़ा होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शाहूनगर व के.सी. पार्कमध्ये अशाच घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे नागरिक भयभीत असून पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
घरातील दागिने व रोकड चोरून नेत असताना सुनंदा यांच्या अंगावरील दागिन्यांकडे लक्ष नव्हते म्हणून की काय, ते 50 हजार रुपये किमतीचे दागिने सुरक्षित राहिले. सुनंदा यांचे सर्व दागिने बॅँकेच्या लॉकरमध्ये असतात. लगAासाठी त्यांनी दागिने काढले होते. लग्न लागल्यानंतर हे दागिने अमळनेर येथेच पर्समध्ये टाकले होते. दरम्यान, चोरटय़ांनी लॉकरची चावी, घराचे कुलूप व अतुल याचे एटीएम कार्डही घेऊन पळाले आहेत. दत्तात्रय बडगुजर यांचे एटीएम कार्ड मात्र चोरटय़ांनी काढून ठेवले आहे.