अखाद्य बर्फ दिसणार निळसर रंगात! १ जूनपासून अंमलबजावण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:10 AM2018-05-09T05:10:10+5:302018-05-09T05:10:10+5:30
अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत.
उन्हाळ््यासह बाराही महिने देशभरात खाद्य बर्फासह अखाद्य बर्फाची निर्मिती केली जाते. काही वस्तूंची साठवणूक तसेच वाहतूक आणि शीतपेट्यांसाठी अखाद्य बर्फाचा वापर होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरात होऊ लागल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. निळा बर्फ म्हणजे खाण्याचा नाही, हे समजणे यामुळे सोपे होईल आणि त्याचा खाण्यासाठी वापर होणार नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढतो. त्यात शीतपेये, विविध फळांच्या रसामध्ये तसेच बर्फाचे गोळे यासाठी वापर वाढतो. यासाठी कोणता बर्फ वापरला जातो, याची शाश्वती नसते.
ंनियम कारखानदारांना सक्तीचा
अखाद्य बर्फ खाद्य पदार्थांच्या संपर्कात येऊ नये, असे आदेश काढूनही तो खाद्य पदार्थांसाठी वापरला जाऊ लागल्याने अखेर सरकारने त्याचा रंग बदलण्याचाच निर्णय घेतला. यामध्ये अखाद्य बर्फ तयार करताना त्यात कारखानदारांनी निळसर रंगाचा वापर करणे सक्तीचे केले आहे. खाद्य बर्फाचा रंग मात्र पूर्वीप्रमाणे पारदर्शक पांढराच राहणार आहे.