साथरोग आणि होमिओपॅथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:00+5:302020-12-15T04:33:00+5:30
साथीच्या आजारांमध्ये प्रतिकारशक्ती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते, ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम तो या कालावधीतही निरोगी आयुष्य जगू ...
साथीच्या आजारांमध्ये प्रतिकारशक्ती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते, ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम तो या कालावधीतही निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यातही होमिओपॅथिक औषधी या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत...
२१ व्या शतकात मानवाने जरी प्रगती साधलेली असली तरी त्याचबरोबरीने अनेक शारीरिक, मानसिक व्याधी देखील त्यासोबतच मानवाला मिळत आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण, शारीरिक व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत आहे. अगदी तिशीतच मधुमेह, रक्तदाब, ॲसिडिटीसारख्या अनेक व्याधी तरुणांमध्ये दिसत आहेत. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने दरवर्षी साथीचे अनेक विकार दरवर्षी वातावरण बदलताच आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, अतिसार, कॉलरा, टायफाॅईडपासून स्वाईन फ्ल्यूपर्यंत अनेक आजार दरवर्षी साथरोग स्वरूपात येतात. एकाच परिसरातील अनेक लोकांना एकच आजार पाहावयास मिळाल्यास त्यास एपीडेमिक किंवा साथरोग म्हणतात. अनेक साथरोगांचे कारण विषाणू किंवा जीवाणू हे असते. प्रतिकारशक्ती कमी होऊन अशा साथीच्या रोगांना अनेक लोक दरवर्षी बळी पडतात. प्रतिकारशक्ती कमी होणे यामागचे प्रमुख कारण असून, स्वच्छतेचा अभाव, अनियंत्रीत जेवण, व्यायामाचा अभाव ही देखील अन्य महत्त्वाची कारणे आहेत. होमिओपॅथिक औषधी या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत. साथीचा रोग असलेल्या परिसरात अगदी सर्वच लोक आजारी होत नाहीत. कारण, ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली ते या आजारावर प्रतिकार करून निरोगी राहतात, म्हणूनच कोणत्याही साथीच्या रोगांवर प्रतिकारशक्ती चांगली राहणे महत्त्वाचे आहे. होमिओपॅथिक औषधी या शरीर व मन या दोन्ही माध्यमातून आजारी व्यक्तीला निरोगी करतात. चिकुनगुनियासारख्या साथीवर वेदनाशामक औषधी देऊन बरेच दुष्परिणाम झालेले दिसून आले. तसेच होमिओपॅथी औषधींना विनासाईड इफेक्ट रुग्णांना बरे देखील करता आलेले आहे. स्वाईन फ्ल्यूसारख्या आजारांवर आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधक औषधी उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात या विनामूल्य वितरण केल्याने प्रतिबंध झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या जागतिक महामारीत जेव्हा उपचार उपलब्ध नव्हते तेव्हा आर्सेनिक अल्बम नावाची होमिओपॅथिक औषधी या जागतिक पातळीवर अनुभवसिद्ध झालेल्या आहेत, म्हणून कुठल्याही साथीच्या आजारावर होमिओपॅथिक औषधी या प्रतिबंधक म्हणून तसेच आजारी रुग्णांना उपचार म्हणून देखील अत्यंत प्रभावी ठरत आहेत. या औषधी लहान मुले, गरोदर माता, मधुमेह, हृदयरोगी या व्यक्तींसह सर्वांना घ्यायला सुलभ आहेत. कोणताही आजार समूळ घालविणे हे होमिओपॅथी औषधीचे मूळ आहे.
- डॉ. रितेश पाटील