फुल बाजारात गणेशोत्सवातच महागाईचा पाऊस! झेंडू १६० तर शेवंती १७० रुपयांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 07:12 PM2023-09-24T19:12:57+5:302023-09-24T19:13:27+5:30
‘गुलाब’ गेला ४०० रुपयांच्या घरात
कुंदन पाटील
जळगाव : गणेशोत्सवाच्या काळात फुलबाजारात फुलांचे भाव प्रचंड वाढले आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यानच महालक्ष्मी उत्सव सुरू होतो. त्यामुळे महालक्ष्मीने परिधान केलेल्या फुलांच्या हाराची किंमत प्रचंड वाढली आहे. गणेशोत्सवापूर्वी ७० ते ८० रुपये किलोने विकली जाणारी फुले आज दीडशे रुपयांवर गेल्याने आता पूजाविधीसाठी अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
फुलांच्या माळांबरोबरच फुलांचे भावही गगनाला भिडले आहेत. फुले पावसामुळे फुलांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पहिल्यांदाच शेतातून नवीन पीक फुलबाजारात पोहोचले आहे. गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी पूजनही होत असल्याने फुलांच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
आवकही घटली
यंदा पावसाने फुलशेती उद्ध्वस्त झाली असून, फुलांचे हार तिपटीने महागले आहेत. तर फुलांची आयात स्थानिक शिरसोली, धामणगाव तसेच नाशिक, सुरत, हैद्राबाद, इंदोर येथून होत आहे. या वर्षी पाऊस अधिक झाला. त्यामुळे फुलशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पर्यायाने फुलांचे उत्पादन थांबले आहे. गणेशोत्सव काळात तर फुलांचा १० ते १५ रुपयांचा हार ३० रुपयांवर गेला आहे. गणेशभक्तांची इच्छा असूनही भाव वाढल्याने हार खरेदी करण्याबाबत त्यांची नाराजी दिसत आहे. शहरामध्ये ७० वर फुले व हार विक्रीची दुकाने आहेत. बाप्पांच्या उत्सव काळात फुलांचे व हारांचे भाव वाढल्याने भाविकांच्या खिशावर भार पडत आहे. झेंडू, लीली, शेवंती, गुलाब आदी फुलांचे, हारांचे भाव गगनाला भिडले आहेत.
असे आहेत प्रतिकिलो दर
झेंडू-१६०
शेवंती- १५०
निशिगंधा-४००
तुकडा गुलाब-१७०
दांडीवाला गुलाब-४००
अस्टर फुले-५००
फुलमाळा
गुलाब-८००
झेंडू-३००
शेवंती-२००
गुलाब-६००
निशीगंधा-३००
अस्टर-४००
यंदा ऐन गणेशोत्सवात दमदार पाऊस झाला. त्यामुळे स्थानिक आवक घटली. तर अन्यठिकाणाहून येणाऱ्या मालही कमी झाला. त्यामुळे या दोन दिवसात प्रचंड भाव वाढले आहेत.
-चंद्रकांत शिनकर, फुल विक्रेते.