पालेभाज्यांची आवक घटली, दर स्थिरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:29+5:302021-05-08T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध आहेत. त्यामुळे सध्या पालेभाज्यांची आवक घटून देखील दर स्थिरच आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध आहेत. त्यामुळे सध्या पालेभाज्यांची आवक घटून देखील दर स्थिरच आहेत. साधारणत: उन्हाळ्याच्या दिवसात पालेभाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे दर वाढतात. मात्र यंदा पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
शुक्रवारी बाजार समितीत ५ क्विंटल मेथीची आवक झाली होती. तर त्याचा दर घाऊक बाजारात १५०० ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल राहिला. पालक देखील ३ क्विंटलच आवक झाली तर त्याचा दर देखील १५०० रुपये प्रतिक्विंटलच होता. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे वासुदेव पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक बाजारात कमी आहे. उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटतेच. यंदा १५ एप्रिलपासून सकाळी सात ते अकरा यावेळेत भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विक्रेते माल कमी घेत आहेत. पालेभाज्यांची विक्री झाली नाही तर त्या फेकाव्या लागतील या भितीपोटी किरकोळ विक्रेते पालेभाज्यांची खरेदी कमी प्रमाणात करत आहेत. त्यामुळे बाजारात या भाज्यांचे भाव सध्या स्थिर आहेत.
२० क्विंटल आंब्यांची आवक
शुक्रवारी बाजार समितीत २० क्विंटल बदाम आंब्यांची आवक झाली होती. त्यासोबत ६ क्विंटल डाळिंब आणि पपई तर ८ क्विंटल मोसंबीची आवक झाली होती. त्यात सर्वात जास्त डाळिंबाने भाव खाल्ला. डाळिंब सात हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला आहे.
भाज्या आवक दर (प्रति क्विंटल)
चवळी १४ क्विंटल एक हजार ते दोन हजार
मेथी ५ क्विंटल दीड ते दोन हजार
पालक ३ क्विंटल दीड हजार
भेंडी १६ क्विंटल दोन हजार
फ्लाॅवर ११ क्विंटल एक ते दीड हजार
कोथिंबीर पाच क्विंटल एक हजार
कारले ४ क्विंटल अडीच हजार
टमाटे ४७ क्विंटल ३०० ते ७५०
पोकळा ४ क्विटल एक हजार
गिलके ७ क्विंटल एक हजार
दोडके २ क्विंटल दीड हजार
शेवगा ३ क्विंटल एक हजार
लिंबू २८ क्विंटल दोन हजार
गवार २२ क्विंटल एक हजार
वांगी ३४ क्विंटल एक हजार