म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन साठ्याची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:43+5:302021-05-19T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्युकरमायकोसिसच्या उपचारात लागणाऱ्या ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व मेडिकल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्युकरमायकोसिसच्या उपचारात लागणाऱ्या ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व मेडिकल डीलर्स, सर्व घाऊक मेडिकल विक्रेते यांनी या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन यांना द्यावी, तसेच जिल्ह्यातील खासगी वितरकांकडे उपलब्ध ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने जेथे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशा रुग्णालयांना आवश्यकतेनुसार द्यावे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या अधिनस्त रुग्णालयात या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास म्युकरमायकोसिसवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांनाच इंजेक्शनचा पुरवठा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध करून द्यावा. या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर औषधांच्या किमतीएवढी रक्कम खासगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड-१९ या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.