इंटरसेफ्टर व्हेईकलची अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:35 PM2019-11-12T22:35:17+5:302019-11-12T22:36:06+5:30
प्रशिक्षण : जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शहर वाहतुक पोलिसांची उपस्थिती
जळगाव - राज्य वाहतूक विभागाकडून राज्यभरातील शहर वाहतूक विभाग तसेच महामार्ग विभागांना अपघातांवर नियंत्रण मिळविता यावे, म्हणून कारवाईसाठी अत्याधुनिक तसेच इंटरसेफ्टर व्हेईकल देण्यात आले. या वाहनांबाबत धुळे येथील महामार्ग विभाग येथे मंगळवारी खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामधील शहर वाहतूक तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात वाहन बनिवणारी एक्स्प्रेरीया टेक प्राव्हटेड लिमिटेड कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी मार्गदर्शन केले.
राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार राज्यभरात विविध ठिकाणी महामार्ग पोलीस तसेच वाहतूक कर्मचाºयांना अत्याधुनिक इंटरसेफ्टर व्हेईकलबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार १२ रोजी धुळे येथील महामार्ग विभाग येथे जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामधील वाहतूक विभाग तसेच महामार्ग विभागाच्या कर्मचारी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. यात विविध ठिकाणचे शहर व महामार्ग विभगााचे ९ पोलीस अधिकारी तसेच ७० कर्मचारी आपआपल्या विभागाला मिळालेल्या इंटरसेफ्टर वाहनांसोबत उपस्थित होते.
९ अधिकाºयांसह ७० कर्मचारी उपस्थित
प्रशिक्षण शिबिरात धुळे महामार्गचे २६ कर्मचारी, शिरपूर महामार्ग केंद्राचे १४, विसरवाडी महामार्ग केंद्राचे ७ कर्मचारी, चाळीसगाव महामार्ग केंद्राचे ५ ,पाळधी महामार्ग केंद्राचे १०, धुळे शहर वाहतूकचे ४, नंदुरबार शहर वाहतूकचे ४, जळगाव शहर वाहतूकचे ५ असे ९ अधिकारी व ७० कर्मचारी उपस्थित होते.