अंधश्रद्धा निमरूलन पायाभूत विकासाचा घटक : अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2017 05:28 PM2017-04-16T17:28:35+5:302017-04-16T17:28:35+5:30

अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

Infrastructure Development Infrastructure: Avinash Patil | अंधश्रद्धा निमरूलन पायाभूत विकासाचा घटक : अविनाश पाटील

अंधश्रद्धा निमरूलन पायाभूत विकासाचा घटक : अविनाश पाटील

Next

 जळगाव,दि.16- : अंधश्रद्धा निमरूलनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव सर्वच पातळीवर होत असून अंधश्रद्धा निमरूलनाचा विचार हा मानव विकासाचा, मानव विकास निर्देशांकाचा पायाभूत घटक आहे. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये काम करायचे म्हणून त्याकडे सर्वानी बघितले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष तथा ‘फिरा’ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचा जिल्हा शाखा प्रेरणा मेळाव्याचे रविवारी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास पाटील यांच्यासह राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, डॉ. प्रदीप जोशी, प्राचार्य एल.पी. देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस. कटय़ारे आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम 
 अंनिसची सुरुवातच संघर्षापासून झाली आहे. याची पायाभरणी 1985 मध्ये झाल्यानंतर 25 ते 30 वर्षात जळगाव जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काम झाले आहे, असा उल्लेख अविनाश पाटील यांनी आवजरून केला. अंधश्रद्धा हा एक प्रश्न आहे. त्याचे निमरूलन झाले पाहिजे. हे समाजानेही मान्य केले असल्याचे ते म्हणाले. 
25 ते 30 वर्षातील संघटीत कामामुळे निराकरण करण्याची मांडणी होऊ शकली असून आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, माध्यम या सर्व पातळीवर अंनिसचा प्रभाव आहे आणि त्याची छाप दिसून येत आहे. त्यामुळे ही एक संधी असून या सकारात्मक, अनुकूल वातावरणाचा आपण फायदा घेत अधिकाधिक काम केले पाहिजे, असे आवाहन  अविनाश पाटील यांनी कार्यकत्र्याना केले. 
मूळ काम होणे गरजेचे
विनायक सावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संघटनात्मक स्थितीचे आव्हान असून सतत भेटत राहणे, नियमित बैठका होणे गरजेचे आहे. आपले मूळ काम जे आहे, ते झाले पाहिजे, त्यात मागे पडायला नको, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Infrastructure Development Infrastructure: Avinash Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.