जळगावात ‘आयटीआय’च्या ८७८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:52 PM2018-06-11T15:52:01+5:302018-06-11T15:52:01+5:30

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे १ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सद्यस्थितीला केवळ १० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे.

Initiative for the 878 seats of the 'ITI' in Jalgaon | जळगावात ‘आयटीआय’च्या ८७८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

जळगावात ‘आयटीआय’च्या ८७८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवेशासाठी आजपासून विद्यार्थ्यांची गर्दी होणारएक व दोन वर्षांचे कोर्स उपलब्धरोजगार उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढला

जळगाव : कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे १ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सद्यस्थितीला केवळ १० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे.
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नॉन इंजिनिअरींग व्यवसाय, इंजिनिअरींग या अंतर्गत एक व दोन वर्षाचे अभ्यासक्रम सुरु आहे.
इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित या कोर्ससाठी १ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
दहावीचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी घोषित झाल्याने आता सोमवार पासून आॅनलाईन प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. गेल्यावर्षी ९०२ जागांसाठी तब्बल अडीच हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. दरवर्षी अर्जांची संख्या वाढत आहे. आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १ व २ वर्ष कालावधीचे २३ कोर्स उपलब्ध आहे. त्यात कॉम्प्युटर आॅपरेटर प्रोग्रामिंगसाठी ५२ जागा आहेत. त्यापाठोपाठ इंजिनिअरींग व्यवसाय एक वर्ष कालावधीसाठी सुतारकाम २६, फॉन्ड्रीमॅन २१, ट्रॅक्टर मॅकॅनिक २१, पम्प आॅपरेटर २१, संधाता ८४, मेकॅनिकल डिझेल ४२, प्लास्टीक प्रोसेसिंग आॅपरेटर ४२. दोन वर्ष कालावधीसाठी यंत्रकारागिर ६४, यंत्रकारागिर घर्षक ४८, जोडारी ८४, कातारी ४८, वीजतंत्री८४, तारतंत्री २१, रेफ्रीजीरेटर अ‍ॅण्ड एअर कंडीशनर ५२, यांत्रिकी मोटारगाडी २१, मेकॅ.इलेक्ट्रॉनिक्स २६, मेलराईट मेंटन्स अ‍ॅण्ड टुल मेंटन्स २१, यांत्रिकी आरेखक २१, टुल अ‍ॅण्ड डायमेकर ४२, आॅपरेटर अ‍ॅडव्हान्स मशिन टुल १६, टुल अ‍ॅण्ड डायमेकर २१ अशा ८७८ जागांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील सर्वाधिक विद्यार्थी आयटीआयला प्रवेश घेतात.
प्रत्येक ट्रेडसाठी मुलींना ३० टक्के आरक्षण
आयटीआयच्या प्रत्येक ट्रेडमध्ये मुलींना ३० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार एकुण मंजुर जागांमधून प्राप्त झालेल्या अर्जात ३० टक्के मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. इलेक्ट्रीशिअन, फिटर, मोटार मॅकेनिकल, वेल्डर, वायरमन या ट्रेडसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद राहतो.
प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक
प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रके, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक-संरक्षण सेवा प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याक उमेदवार प्रमाणपत्र, तांत्रिक उमेदवार प्रमाणपत्र, इंटरमिजीएट प्रमाणपत्र, क्रीडा अधिकारी प्रमाणपत्र, बोस्टर स्कूल अनाथाश्रम उमेदवाराचे प्रमाणपत्र.

Web Title: Initiative for the 878 seats of the 'ITI' in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.