जळगावात ट्रकच्या धडकेत औषधी वितरण कंपनीचा प्रतिनिधी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 PM2018-11-16T12:43:51+5:302018-11-16T12:44:49+5:30

जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार

Injured in reporter of drug distribution company in Jalgaon | जळगावात ट्रकच्या धडकेत औषधी वितरण कंपनीचा प्रतिनिधी जखमी

जळगावात ट्रकच्या धडकेत औषधी वितरण कंपनीचा प्रतिनिधी जखमी

Next

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात ललित पंढरीनाथ चौधरी (२७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी साडे बारावाजेदरम्यान महामार्गावर झाला.
ललित चौधरी हे एका औषधी वितरकांकडे वसुलीचे काम करतात. बुधवारी दुपारी ते वसुली करून खोटनगरकडून जळगाव शहराकडे येत होते. त्या वेळी मानराज पार्कनजीक त्यांच्या दुचाकीस मागून येणाºया ट्रकने (क्रमांक एम.एच. १२, सीटी ६८३५) जोरदार धडक दिली. यात ते चाकाखाली येऊन ट्रकने त्यांना बºयाच अंतरापर्यंत ओढत नेले. घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीस धडक देणारा ट्रक जिल्हा पेठ पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Injured in reporter of drug distribution company in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.