डोक्यावर काच पडल्याने तरुण जखमी
By admin | Published: March 2, 2017 12:54 AM2017-03-02T00:54:20+5:302017-03-02T00:54:20+5:30
‘गोलाणी’मधील घटना : मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत होता धरणगावचा तरुण
जळगाव : गोलाणी मार्केटच्या तिसºया मजल्यावरील खिडकीची काच तुटून ती थेट सैयद जुबेर सैयद जहांगीर (वय १९ रा.धरणगाव) या तरुणाच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता गोलाणी मार्केटमध्ये दुसºया मजल्यावर घडली. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेत नशिबाने तो बचावला आहे.
धरणगाव येथील रहिवाशी असलेला सैयद जुबेर हा १२ उत्तीर्ण झालेला असून गेल्या आठ दिवसापासून तो गोलाणी मार्केटमधील दुसºया मजल्यावरील अभिनव मोबाईल या दुकानदाराकडे मोबाईल दुरुस्तीचे शिक्षण घेत होता. दररोज तो धरणगाव येथून बसने ये-जा करतो. दुकानात काम करीत असताना बाहेर वºहांड्यात पाणी पिण्यासाठी आला असता त्याच वेळी तिसºया मजल्यावरील दुकानाची खिडकीची काच तुटली व ती थेट सैयद जुबेर याच्या डोक्यात पडली. डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. हा प्रकार पाहिल्यानंतर सुखराम नन्नवरे यांनी त्याला तातडीने खासगी दवाखान्यात नेले.
गंभीर दुखापत, मात्र धोका टळला
या घटनेत सैयद जुबेर याला गंभीर दुखापत झाली असली तरी धोका टळला आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही काच मेंदूला लागली असती तर कदाचित त्याच्या जिवावर बेतले असते. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाचा भाऊ व वडील यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक एक मध्ये उपचार सुरू आहेत. ज्या दुकानातील खिडकीची काच तुटली, त्या दुकानात अजूनही धोकेदायक काच आहेत.