भुसावळ तालुक्यातील साकरी पाझर तलावातील गौणखनिज प्रकरणांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:46 AM2018-12-11T01:46:03+5:302018-12-11T01:47:37+5:30

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठेवला आहे.

Inquiries of the Gokhanjanj case in Sakri Pazar lake of Bhusawal taluka are being investigated by Zilla Parishad | भुसावळ तालुक्यातील साकरी पाझर तलावातील गौणखनिज प्रकरणांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

भुसावळ तालुक्यातील साकरी पाझर तलावातील गौणखनिज प्रकरणांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पाच्या बाहेरही ठेकेदारांनी केली अतिक्रमणजि .प .सदस्या पल्लवी सावकारे यांनी यांनी दिली भेट

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठेवला आहे.
दरम्यान, या प्रकल्पातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी आतापर्यंत किती गौणखनिज उचलण्यात आले. यासंदर्भात मोजमाप करण्याची सूचना जलसंधारण उपविभागीय अधिकारी रवी पाटील यांना दिल्या. यामुळे सोमवारी मोजमाप करण्यात आले, तर प्रकल्पाच्या बाहेरही अतिक्रमण करून संबंधित ठेकेदाराने अवैध गौणखनिज उचलल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी सोमवारी प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. त्यांच्या जागृततेने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गौणखनिज चोरी कुणाच्या आशीवार्दाने सुरू आहे. तसेच गौणखनिज उचलण्याचे धाडस ठेकेदार करतोस कसा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
साकरी येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामागार्साठी साकरी येथील गट क्रमांक २५४ मधील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून गौण खनिज (गाळ) उचलण्याची परवानगी जिल्हाधिकºयांनी दिली आहे. जिल्हाधिकाºयांनी केवळ सहा डंपरने आॅक्टोबर व नोव्हेंबरपर्यंत गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. यात २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याचे नमूद केले आहे. ठेकेदाराने मात्र तब्बल वीस ते पंचवीस डंपर लावून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यासंदर्भात ठेकेदार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची ऐशी तैशी करून गौण खनिज उचलत असल्याचे दिसून येत आहे .
दरम्यान , ग्रामस्थांनी शनिवारी रात्री या डंपरला रात्रीची परवानगी आहे का, असा प्रश्न विचारून गौणखनिज उचलण्यासाठी मज्जाव केला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तहसीलदार थोरात यांनी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गौणखनिज वाहतुकीस कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर ठेकेदाराने महिनाभरात किती ब्रास गौण खनिज उचलले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Inquiries of the Gokhanjanj case in Sakri Pazar lake of Bhusawal taluka are being investigated by Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.