पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:55+5:302021-06-30T04:11:55+5:30
जळगाव : शहरातील ब.गो. शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शिक्षण अधिका-यांनी ...
जळगाव : शहरातील ब.गो. शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शिक्षण अधिका-यांनी त्रिदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने मंगळवारी मुख्य तक्रारदारासोबत शाळेल भेट दिली. यावेळी समितीतील सदस्यांनी चौकशीसाठी आवश्यक असलेले दप्तर तयार ठेवण्याचे आदेश शाळेला दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित बग़ो़ शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी यांना या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश केले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी सतिष चौधरी, शामकांत न्याहळदे, अजित तडवी यांची समिती नेमण्यात आली होती. ही समिती मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांच्यासाेबत मंगळवारी शानभाग विद्यालयात पोहोचली होती. यावेळी आवश्यक दप्तर तयार करून ठेवण्याच्या सूचना समितीने शाळेला केल्या असून विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन समिती व तत्कालीन मुख्याध्यापकांचे जबाब नोंदविले जाणार असल्यामुळे, त्यांना देखील जाबजबाबासाठी दिलेल्या तारखेला बोलविण्याच्या सूचना केली आहे.