‘फास्टॅग’मधून पैसे कापले गेल्याप्रकरणी ‘नही’च्या अधिकाऱ्यांचे चौकशी आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:19+5:302021-09-25T04:16:19+5:30

जळगाव : नशिराबाद टोलनाक्यावर वाहन गेले नसतानाही वाहनधारकाचे फास्टॅगमधून पैसे कापले गेल्याचा प्रकार जळगावमधील एका वाहनधारकाच्या बाबतीत घडला आहे. ...

Inquiry order of 'No' officials in the case of money being deducted from 'Fastag' | ‘फास्टॅग’मधून पैसे कापले गेल्याप्रकरणी ‘नही’च्या अधिकाऱ्यांचे चौकशी आदेश

‘फास्टॅग’मधून पैसे कापले गेल्याप्रकरणी ‘नही’च्या अधिकाऱ्यांचे चौकशी आदेश

Next

जळगाव : नशिराबाद टोलनाक्यावर वाहन गेले नसतानाही वाहनधारकाचे फास्टॅगमधून पैसे कापले गेल्याचा प्रकार जळगावमधील एका वाहनधारकाच्या बाबतीत घडला आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी लोकमतमधून प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी महामार्ग प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याच्याही सूचना केल्या आहेत.

जळगावातील रहिवासी नंदकिशोर चोपडे यांचे वाहन जळगावातील महावितरणच्या कार्यालयात भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिले आहे. तसेच या वाहनावर ते स्वत: चालक आहेत. २१ सप्टेंबर रोजी चोपडे हे जळगावहून भुसावळला या वाहनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाताना त्यांनी नशिराबाद टोलनाक्यावर फास्टॅग या सिस्टीमच्या माध्यमातून दोन्ही बाजूचा टोल भरला. मात्र, २२ सप्टेंबर रोजी त्यांचे वाहन टोलनाक्यावर गेले नसतानाही त्यांच्या फॉस्टॅग सिस्टीममधून जळगाव ते भुसावळ प्रवासाचा ८५ रुपये टोल पडला. वाहन टोलनाक्यावर गेले नसतानाही अशाप्रकारे फास्टॅगमधून पैसे कापले गेल्यामुळे चोपडे यांनी टोलनाका प्रशासनाकडे तक्रारही केली आहे. तसेच या प्रकाराची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनेही गंभीर दखल घेतली आहे.

इन्फो :

टोलनाक्यावर वाहन गेल्यावरच फास्टॅग सिस्टीममधून पैसे कट होतात. मात्र, संबंधित वाहनधारकाचे वाहन टोलनाक्यावर गेले नसतानाही पैसे कसे कापले गेले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसाने त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर हा प्रकार कशामुळे झाला आहे, हे समजणार आहे.

- चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव

Web Title: Inquiry order of 'No' officials in the case of money being deducted from 'Fastag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.