शिक्षक भरतीच्या तक्रारीवरून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:23 AM2021-02-26T04:23:10+5:302021-02-26T04:23:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षक भरती आणि शाळांच्या मान्यतेबाबतच्या तक्रारींवरू उपसंचालक नितीन उपासनी यांनी चौकशी सुरू केली असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिक्षक भरती आणि शाळांच्या मान्यतेबाबतच्या तक्रारींवरू उपसंचालक नितीन उपासनी यांनी चौकशी सुरू केली असून या चौकशी समितीने धुळ्यात चौकशी केली. तर जळगाव शिक्षण विभागातूनही दप्तर जमा केले आहे. यासह उर्वरित माहिती सादर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे.
संचालक स्तरावरील एका समितीने आज दिवसभर धुळ्याच्या शिक्षण विभागात चौकशी केली. यात प्रभारी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-धनकर या उपस्थित होत्या. यात सहसंचालक पुष्पलता पाटील, लेखाधिकारी मनिष कदम, शिक्षणविस्तार अधिकारी दिनेश देवरे यांचा समितीत समावेश होता. दरम्यान, आजुबाजूच्या जिल्ह्याची माहितीही त्यांनी मागितली आहे. यात गेल्या आठवडाभरात उपसंचालक नितीन उपासनी हे जळगावात आले होते. त्यांनी माध्यमिक विभागातही काही वेळ तपासणी केली होती. यात त्यांनी या कागदपत्रांबाबत तपासणी केली मात्र, ताळमेळ बसत नसल्याने हे रेकॉर्ड जमा करून घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, जळगावची पुढील आठवड्यात चौकशी होणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांना उर्वरित माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.