फैजपूर येथे इन्साफ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:51 AM2018-09-13T00:51:07+5:302018-09-13T00:52:11+5:30
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद, ता.यावल येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे इन्साफ मोर्चा फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बामणोद ते फैजपूर असा पायी इंसाफ मोर्चा पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. हा मोर्चा फैजपूर शहरात आल्यानंतर सुभाष चौक येथून छत्री चौक मार्गे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की बामणोद येथील बोध्द समाजावरील गुन्हे रद्द करा व गावात शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी शांतता कमिटी बैठक तातडीने घ्या व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसह दोन्ही गटातील शाळकरी व कॉलेजचे विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून दोघांनवरील गुन्हे रद्द करा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या मागण्यांविषयी विचार न झाल्यास १९ रोजी सुभाष चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी जगन सोनवणे यांनी सांगितले या मोर्चांत पीआरपी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ, श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी यांच्यासह महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.