सुरतहून येणाऱ्या ८० मजुरांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:49 PM2020-04-03T23:49:52+5:302020-04-03T23:50:16+5:30
शासकीय रूग्णालयात आणला ट्रक
जळगाव : सुरतहून रावेर तालुक्यात विविध गावांमध्ये परतत असलेल्या ८० मजुरांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात तपासणीसाठी नेले. यात अनेक लहान मुलांचा समावेश असून सर्वांची तपासणी करून त्यांना सोडण्यात आले. यासाठी सदर ट्रक थेट रुग्णालयात आणण्यात आला होता.
रावेर तालुक्यातील विवरे, सावदा यासह अनेक गावांतील ८० मजूर एका ट्रकमधून परतत होते. पाळधी जवळ पोलिसांनी हे वाहन अडवून विचारपूस केली असता हे मजूर घरी जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अरुणनिकुंभ, पोलीस नाईक विजय चौधरी, दत्तात्रय ठाकरे यांनी हा ट्रक शासकीय रूग्णालयात आणला. या ठिकाणी कोरोना वार्डात या मजुरांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.