जर्मनीच्या संस्थेकडून केळी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
By admin | Published: July 8, 2017 01:17 PM2017-07-08T13:17:20+5:302017-07-08T13:17:20+5:30
ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रॉडक्ट्स को-ऑफ सोसायटीच्या ‘केळी खोडावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धीत उत्पादनांची निर्मिती
Next
ऑनलाईन लोकमत
फैजपूर, जळगाव, दि.8 - जर्मनीच्या के.एफ.डब्ल्यू संस्थेचे विनफ्रीड सुई यांनी आज येथील ताप्ती व्हॅली बनाना संस्थेला भेट देऊन पाहणी केली. नाबार्डने यशस्वी प्रकल्प म्हणून ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रॉडक्ट्स को-ऑफ सोसायटीच्या ‘केळी खोडावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धीत उत्पादनांची निर्मिती या प्रकल्पाची के.एफ.डब्लू संस्थेचे विनफ्रिड सुई यांना दाखविण्यासाठी निवड केली आहे. आज सुई, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तज्ज्ञ नरेंद्र राठोड, सल्लागार विकास सिंह, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक सुनील जाधव, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक जी.एम.सोमवंशी यांचे पथक केळी खोडावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आले. त्यांचे ताप्ती व्हॅलीचे चेअरमन आमदार हरीभाऊ जावळे यांनी माहिती दिली.