मोहाडी रुग्णालयाच्या विस्ताराबाबत पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:28+5:302021-05-25T04:19:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोहाडी महिला रुग्णायात सध्या कोविड रुग्णालय सुरू असून, आगामी तिसऱ्या लाटेची शक्यता बघता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी महिला रुग्णायात सध्या कोविड रुग्णालय सुरू असून, आगामी तिसऱ्या लाटेची शक्यता बघता या रुग्णालयात विविध सुविधा तसेच या रुग्णालयाचा विस्तार करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प. सीईओ डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी रुग्णालयात पाहणी केली. या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होणार असून, येत्या दोन दिवसात त्याचे फाऊंडेशनचे काम होणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
यासह म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रियांसाठी या ठिकाणी ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार असून, त्याचाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आढावा घेतला. यासह तिसऱ्या लाटेत बालकांची बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर त्यादृष्टीनेही नियोजन कसे राहणार, याचाही आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या १५ दिवसात ऑक्सिजन प्रकल्पाचे काम होऊ शकते, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.