एरंडोल व चाळीसगाव तालुक्यात रेशन दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:35+5:302021-05-23T04:15:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान गरजूंना नियमित धान्य मिळत आहे की नाही याविषयी पाहणी करण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान गरजूंना नियमित धान्य मिळत आहे की नाही याविषयी पाहणी करण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने एरंडोल तालुक्यात १२ व चाळीसगाव तालुक्यात १७ दुकानांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान धान्य वाटप सुरू असल्याचे आढळून आले. हे धान्य सुरळीत वितरित करण्यात यावे, त्यात कोणताही अडथळा येऊ नये, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिले.
सर्व धान्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत व सुरळीतपणे वितरण व्हावे यासाठी महसूल विभागाच्यावतीने व पथक तयार करण्यात आले. या पथकाने एरंडोल व चाळीसगाव तालुक्यात पाहणी केली. धान्य वितरण करताना कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही यासह देय असलेल्या धान्य वाटपाचा फलक, योजनानिहाय धान्य याविषयीच्या सूचना लावण्याचे निर्देश आहे. याचेही पालन होत आहे की नाही याचीदेखील पडताळणी पथकाद्वारे केली जात आहे.
गेल्यावर्षी कोरोना काळात नियमांचे पालन न केल्याने अनेक दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला होता. यावर्षी देखील आता तपासणी सुरू करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमांचे पालन करण्यासह गरजूंना धान्य वितरित करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.