जळगाव जिल्ह्यात चार पुरवठा अधिका-यांमार्फत रेशन गोदामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:19 PM2018-01-31T13:19:38+5:302018-01-31T13:23:11+5:30

अहवाल जिल्हाधिका-यांकडे सादर

Inspection of ration warehouses through four supply officers | जळगाव जिल्ह्यात चार पुरवठा अधिका-यांमार्फत रेशन गोदामांची तपासणी

जळगाव जिल्ह्यात चार पुरवठा अधिका-यांमार्फत रेशन गोदामांची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही अहवालात दडलय काय?दोनही अहवालाबाबत गुप्तता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 -जिल्ह्यातील रेशनच्या गोदामांची मुंबईच्या पथकाने तपासणी केल्यानंतर उर्वरित  चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची बाहेरील जिल्ह्यातील पुरवठा अधिका:यांमार्फत तपासणी करण्यात आली. याचाही अहवाल या अधिका:यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सादर केला. दरम्यान, दोनही अहवाल अद्याप पाहिले नसल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. 
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे रेशनच्या गोदामांची अचानक पाहणी केल्यानंतर तेथे अनियमितता आढळून आली होती. या संदर्भात खडसे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांच्याकडे तक्रार  केली होती.  या तक्रारीनुसार मुंबई येथील 12 जणांचे पथक जिल्ह्यात आले होते.  या  पथकाने जिल्ह्यातील गोदामांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान काही गोदामातील दप्तरही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी  जिल्हाधिका:यांना अहवाल सादर केला होता. 
यामध्ये जिल्ह्यातील   चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची  तपासणी राहिली होती. त्यासाठी  दुसरे एक पथक जिल्ह्यात येणार होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी स्थानिक पातळीवर तपासणी करण्याविषयी जिल्हाधिका:यांना सूचविले होते. मात्र स्थानिक पातळीवर तपासणी केल्यास अडचण नको व नि:संशय तपासणी व्हावी म्हणून बाहेरील पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर येथील जिल्हा पुरवठा अधिका:यांमार्फत वरील तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी या अधिका-यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे सादर केला. 
या दोनही अहवालाबाबत गुप्तता पाळली जात असल्याने अहवालात काय दडलय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईच्या पथकामार्फत गोदामांची तपासणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यासाठी चार पुरवठा अधिकारी आले होते. त्यांनीही अहवाल दिला आहे. दोन्ही अहवाल अद्याप पाहिले नाही. 
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी. 

Web Title: Inspection of ration warehouses through four supply officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.