जलव्यवस्थापनाच्या कार्यातून लघुपट निर्मितीची प्रेरणा
By admin | Published: May 23, 2017 05:10 PM2017-05-23T17:10:18+5:302017-05-23T17:10:18+5:30
दोंडाईचा येथील धनंजय नेवाडकर यांच्या लामकानीचे जलव्यवस्थापनावर पुण्याच्या तरुणांकडून लघुपट
Next
लोकमत ऑनलाईन विशेष /निखील कुलकर्णी
धुळे, दि.23- लामकानीसारख्या लहानशा गावात लोकसहभागातून उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा नमुना सादर करून गावाला टंचाईच्या छायेतून मुक्त केल्याच्या डॉ़धनंजय नेवाडकर यांच्या कार्याला लघुपटाच्या माध्यमातून पुणे येथील अनुप जयपूरकर व गांधार पारखी या विद्याथ्र्यानी जगासमोर आणले आहे. या लघुपटामुळे डॉ़ धनंजय नेवाडकर यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘ग्रीन हिरो’ म्हणून गौरविण्यात आल़े
पुणे येथील इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेत पर्यावरण शास्त्राचा कोर्स करीत असतांनाच गेल्या वर्षी लामकानी येथे अभ्यास दौ:याच्या निमित्ताने आलो व जलव्यवस्थापनाची पाहणी केली़ दोंडाईचा येथील रहिवासी व जलव्यवस्थापक डॉ़ धनंजय नेवाडकर यांनी लोकसहभाग आणि स्वत:च्या नियोजनातून लामकानी, ता.धुळे गावाला जलसमृध्द केल़े डोंगरमाथ्यावर चा:या खोदून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी झालेले प्रयत्न, वेगवेगळया प्रकारच्या गवताच्या प्रकारांची लागवड करून तयार करण्यात आलेली कुरणे, नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडविणे, ठिकठिकाणी झालेले वृक्षरोपण, पिण्यासह सिंचनासाठी उपलब्ध झालेले पाणी हे लामकानी गावाच्या लोकसहभागातील कामांचे फलित आह़े पुण्याच्या इकोलॉजिकल संस्थेच्या माध्यमातून गांधार पारखी व अनुप जयपूरकर यांनी ऑगस्ट महिन्यात लामकानी गावाची माहिती घेतली होती़ ‘द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्स्टिटय़ुट’ नवी दिल्ली व अमेरिकन दुतावास, मुंबई यांच्यातर्फे पर्यावरण क्षेत्रात लोकसहभागाने काम केलेल्या व्यक्तींवर लघुपट तयार करणे ही स्पर्धा आयोजित केली होती़ डॉ़ धनंजय नेवाडकर यांच्या लामकानी गावातील कामावर लघुपट बनविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार तयार केलेल्या त्यांच्या लघुपटावर यशस्वीतेची मोहर लागली व मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दोन्ही विद्यार्थी व डॉ़ नेवाडकर यांना सन्मानित करण्यात आल़े या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेते अभिषेक बच्चन उपस्थित होत़े लामकानी सारख्या लहानशा गावातील जलव्यवस्थानाचे कार्य या निमित्ताने देशभरात गेल़े पर्यावरण व जल व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या अनेक संस्था, संघटनांनी या लघुपटास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़
‘लामकानी- अ टेल ऑफ डॉक्टर’़़़
पुण्याच्या त्या तरूणांनी लामकानी गावाची पाहणी केल्यानंतर जल व्यवस्थापनावर लोकसहभागातून किती काम शक्य होऊ शकते हे सर्वासमोर यावे या उद्देशाने लघुपट तयार केला. जानेवारीत प्रत्यक्ष शुटींग करून ‘लामकानी- अ टेल ऑफ डॉक्टर’ या पाच मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली़ जवळपास 10 हजार रूपयांच्या खर्चातून साकारलेल्या या लघुपटाची स्पर्धेत प्रथम दहामध्ये निवड झाली़ या लघुपटामुळे डॉ़ धनंजय नेवाडकर यांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ‘ग्रीन हिरो’ म्हणून गौरविण्यात आल़े