वडिलांनी दिली लिहिण्याची प्रेरणा

By admin | Published: May 18, 2017 11:18 AM2017-05-18T11:18:25+5:302017-05-18T11:18:25+5:30

यातून शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली

Inspiration to write by the elders | वडिलांनी दिली लिहिण्याची प्रेरणा

वडिलांनी दिली लिहिण्याची प्रेरणा

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 18 - शाळेमध्ये असताना वडील दररोज सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारायचे. कधी नवीन घडामोडीसंदर्भात माहिती सांगायचे. यातून शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे  विविध विषयांवरील वाचन करीत होते. तेव्हा त्या वाचन अनुभवातून नकळतपणे हातात लेखणी आली. प्रथम स्त्रियांच्या अडचणी, त्यांचे दैनदिन जीवन, त्यांची व्रतवैकल्ये, त्यांचे स्वत:चे विश्व यासंदर्भात लहान लहान लेख लिहिले.
एकदा  यजमानांनी उत्सुकता म्हणून एक लेख वाचला आणि क्षणाचाही विलंब न लावता तो लेख वर्तमानपत्राला पाठवून इतर वाचकासाठी उपलब्ध करून द्यावा, असा केवळ सल्ला दिला नाही तर स्वत: तो लेख वर्तमानपत्राकडे पाठविला आणि 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून 14 वर्षापूर्वी तो प्रसिद्ध झाला. ‘कोण म्हणे तू अबला नारी, रूप दुर्गेचे तुङया उरी’ हा लेख वाचून गृहिणीपासून तर नोकरी करणा:या भगिनीर्पयत सर्वानी फोन करून कौतुक तर केलेच आणि तुम्ही खूप छान लिहितात. असेच लेखन पुढेही करत राहा, अशी प्रेरणाही दिली आणि ख:या अर्थाने लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध विषयांवर लिखाण सुरू झाले. त्यामध्ये जनरेशन गॅप, सुखी व समृद्ध जीवनाचे टॉनिक, हास्य, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, तणावमुक्त जीवन कसे जगावे, स्त्रियांचे सामाजिक स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबील, राष्ट्रीय एकात्मता असे विविध विषय मनात डोकावले.
विचार पक्का झाला आणि लेखणी फिरू लागली, ती आजतागायत सुरू आहे. लेखन वाचून गुरू ब.बी. पंडित यांनी माङयातल्या लेखिकेला ओळखले आणि म्हणाले, ‘सारखे वैचारिक खाद्य भावी शिक्षकांना पुरविले तर अधिक सक्षम आणि समृद्ध सामाजिक अभियंते घडविता येतील. विचार कर.’
सरांच्या या प्रेरक शब्दांमुळे लिखाणाचा विचार पक्का केला आणि सरांबरोबर व मार्गदर्शनाखाली उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक या बी.एड. अभ्यासक्रमाच्या पहिल्या पुस्तकाचा जन्म झाला. या प्रथम पुस्तकाचे अभ्यासू विद्याथ्र्यानी इतके जोरदार स्वागत केले की, तीन वर्षात पुस्तकाच्या चार आवृत्ती निघाल्या  आणि बघता बघता एक साधी प्राध्यापिकेने 12 पुस्तके लिहिली. लेखनाची ही आवड आता जणू सवयच झाली आहे.
- प्रा. डॉ. लता मोरे

Web Title: Inspiration to write by the elders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.