कोरोना बाधितांच्या अनुभवातून मिळाली प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 03:04 PM2020-08-12T15:04:12+5:302020-08-12T15:04:27+5:30

रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोरोना भगाओ' अभियानांतर्गत आॅनलाईन व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात कोरोना बाधितांचा अनुभव सामान्य जनतेला कळावा व त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

Inspired by the experience of the Corona victims | कोरोना बाधितांच्या अनुभवातून मिळाली प्रेरणा

कोरोना बाधितांच्या अनुभवातून मिळाली प्रेरणा

Next

भुसावळ, जि.जळगाव : रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आणि एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोरोना भगाओ' अभियानांतर्गत आॅनलाईन व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात कोरोना बाधितांचा अनुभव सामान्य जनतेला कळावा व त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी यासाठी भुसावळ येथील सर्जन डॉ.आशुतोष केळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मनीषा दावलभक्त आणि मेडिकल व्यावसायिक हेमंत शर्मा या तीन कोरोना बाधितांचे 'मला कोरोना झाला तेव्हा' या शीर्षकाखाली झूम अ‍ॅप आणि फेसबूक लाईव्ह या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानात डॉ.दावलभक्त यांनी त्यांचा अनुभव कथन केला. कोरोना होऊ नये म्हणून व झालाच तर काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
हेमंत शर्मा यांनी त्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोना झाल्यावर सरकारी उपचाराचा आलेला अनुभव तसेच तेथील चांगल्या सुविधा व त्रुटी याबाबत विचार मांडले.
डॉ.आशुतोष केळकर यांनी खुमासदार शैलीत त्यांचा अनुभव कथन केला. तीनही वक्त्यांनी श्रोत्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. या व्याख्यानाचा तिनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
डॉ.मकरंद चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदशन अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शाह, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मकरंद चांदवडकर, डॉ.नितीन दावलभक्त व राहुल लुंकड, विशाल कदम आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Inspired by the experience of the Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.