शिक्षकाची तळमळ अन् आत्मियतेने मिळाली प्रेरणा - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:50 PM2019-09-05T13:50:42+5:302019-09-05T13:50:51+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकापर्यंतचा प्रवास करणाऱ्या डॉ.पंजाबराव उगले यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते शिक्षक?

Inspired by the teacher's spirit and spirit | शिक्षकाची तळमळ अन् आत्मियतेने मिळाली प्रेरणा - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

शिक्षकाची तळमळ अन् आत्मियतेने मिळाली प्रेरणा - पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले

Next

जळगाव: आपल्या विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घ्यावे, खूप मोठं व्हावे...उच्च पदावर पोहचावे...तो मोठा झाला म्हणजे आपण मोठे झालो.गावाचे, शाळेचे व पालकांचेही नाव त्यात मोठे होते..आर.जे.कुळकर्णी (रा.नेवासा, जि.अहमदनगर) हे शिक्षक नेहमीच वर्गातील विद्यार्थ्यांना अत्यंत पोटतिडकीने व तळमळीने सांगत असायचे. त्यांचे हे बोल खºया अर्थाने प्रेरणा देणारे ठरले अन् आयपीएस झालो आणि वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदापर्यंत पोहचून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी मिळाली. हा अनुभव सांगताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.
पहिली ते चौथी देवसरे, ता.नेवासा, जि.अहमदनगर या मुळ गावी शिक्षण झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण वेगवेगळ्या गावांत झाले. ११ व १२ वी नेवासा तर पशुवैद्यकिय शिक्षण प्रवरा नगर येथे झाले. सातवी ते दहावी या काळात आर.जे.कुळकर्णी या शिक्षकांनीच खºया अर्थाने घडविण्याची प्रेरणा दिली. शिस्त व प्रेरणा या दोन्ही बाबी कुळकर्णी यांनीच शिकविल्या. पुढे वन विभागातील अधिकारी होण्याचे आकर्षण निर्माण झाले. नंतर पोलिसांच्या खाकीविषयी क्रेझ निर्माण झाली आणि त्यासाठी जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो व त्यात यशस्वीही झालो.अर्थातच सर्व श्रेय गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!
पूत्र आणि मित्र...भेदभाव नाहीच
मी अभ्यासात हुशार होतो, तसा कुळकर्णी सरांचा मुलगा देखील हुशार होता. आम्ही दोघं चांगले जीवलग मित्र होतो. आम्ही दोघंच नेहमी वर्गात पहिला आणि दुसरा असे असायचो. आमच्यात तिसरा कधी आलाच नाही. शिक्षकांनी कधी मुलाचा मित्र आणि पूत्र असा भेदभाव केला नाही. उलट तू मला त्याच्यापुढे गेला पाहिचे असेच सांगून प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांचाही मुलगा अभियंता झाला.
हाथी मेरे साथी चित्रपट भावला
‘हाथी मेरे साथी’ या हिंदी चित्रपटानेही जीवनात खूप बदल केला. या चित्रपटामुळे जंगल, प्राणी व पर्यावरणावर प्रेम निर्माण झाले तसेच ‘खाकी’चे आकर्षण वाढले. पुढे काही वर्षात गावातील एक उपनिरीक्षक मुलगा गणवेशात शाळेत आला. त्याने भाषण दिले..तेव्हा शिक्षकांनी त्याचे कौतुक करुन मुलांनाही त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला सांगितले. तेव्हा पोलिसांच्या खाकीचे आकर्षण वाढले.
अन् शिक्षकांच्या डोळ्यात आले पाणी
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बारावीत ८० टक्के गुण मिळाले. निकालाचे हे गुणपत्रक घेऊन पहिली ते चौथीपर्यंत शिकविणाºया सावंत व फाटके या दोन्ही शिक्षकांकडे गेलो तेव्हा..निकालपत्र पाहून या दोन्ही शिक्षकांचे डोळे पाणावले..रुमालाने डोळ्यातील पाणी पुसून ते म्हणाले..तु नक्की मोठा व्यक्ती होशील असे म्हणत आमचीही मान गर्वाने ताठ झाली असे म्हणत त्यांनी आशिर्वाद दिले.

Web Title: Inspired by the teacher's spirit and spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव