हप्तेखोरी करणा:या 9 कर्मचा:याची उचलबांगडी

By Admin | Published: January 8, 2017 12:37 AM2017-01-08T00:37:36+5:302017-01-08T00:37:36+5:30

जळगाव : एकीकडे अतिक्रमण काढायचे तर दुसरीकडे अधिका:यांच्या नावाने पैसे घेऊन गुपचूप भाजीपाला विक्रीस बसण्याची परवानगी द्यायची

The installer: The 9 employees: the pick-up | हप्तेखोरी करणा:या 9 कर्मचा:याची उचलबांगडी

हप्तेखोरी करणा:या 9 कर्मचा:याची उचलबांगडी

googlenewsNext


जळगाव : एकीकडे अतिक्रमण काढायचे तर दुसरीकडे अधिका:यांच्या नावाने पैसे घेऊन गुपचूप भाजीपाला विक्रीस  बसण्याची परवानगी द्यायची  असे प्रकार अतिक्रमण विभागातील दोन महिला कर्मचा:यांसह नऊ जण करत असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने या कर्मचा:यांची इतर विभागात तत्काळ बदली केली जावी असे प्रस्ताव अतिक्रमण विभागाच्या अधीक्षकांनी आयुक्तांकडे दिला आहे.
बळीराम पेठेत हप्तेखोरी
वर्षानुवर्षे बळीराम पेठेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणा:यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनेक वेळा जप्तीची कारवाई केली. याच परिसरातील काही खाजगी रिकाम्या जागांवर हे भाजी विक्रेते व्यवसाय करीत आहेत तर त्याच्या समोरील भागातील एका गल्लीत काही भाजी विक्रेते बसत असतात. मात्र त्यासाठी त्यांना अतिक्रमण विभागातील काही जणांना पैसे मोजावे लागत असतात.
दोन महिला कर्मचा:यांचा समावेश
अधिका:यांच्या नावाने हप्तेखोरी करणे, कारवाई करणा:या अतिक्रमण विभागातील कर्मचा:यांना दमबाजी करणे असे प्रकार याच विभागातील 9 जणांकडून झाल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात दोन महिला कर्मचा:यांचाही समावेश आहे. या दोन टप्प्यातील प्रस्तावात या कर्मचा:यांची अन्य विभागात तात्काळ बदली केली जावी  अशी शिफारस अतिक्रमण विभागाने केली आहे.
आयुक्तांकडून कानउघाडणी
अतिक्रमणे लावण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकारावरून आयुक्तांनी दोन दिवसापूर्वी या विभागातील कर्मचा:यांना एकत्र बोलावून त्यांची चांगलीच खरपट्टी काढली मात्र तरीही उपयोग न झाल्याने आता या कर्मचा:यांच्या   उचलबांगडीचा प्रस्ताव  अतिक्रमण अधीक्षकांनी दिली असून दोन दिवसात हे आदेश निघणार आहेत.

Web Title: The installer: The 9 employees: the pick-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.