रेमडेसिविरच्या पुरवठ्याविषयी प्रशासनाला कळविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:42+5:302021-04-14T04:14:42+5:30
डॉक्टरांनीच वापर करावा रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होते. अधिक रक्कम घेतली जाते, हे टाळण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शन आणण्याचे सांगण्यापेक्षात ...
डॉक्टरांनीच वापर करावा
रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफिर होते. अधिक रक्कम घेतली जाते, हे टाळण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शन आणण्याचे सांगण्यापेक्षात रुग्णालयात डॉक्टरांनीच रुग्णाला हे इंजेक्शन द्यावे व त्याची रक्कम बिलात लावावी, अशा सूचना डॉक्टरांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
डॉक्टरांनी रुग्णालयातच रुग्णांना रेमडेसिविर दिले व काही रुग्णांना ते मिळाले नाही तर अशा रुग्णांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
मोहाडी रुग्णालयातून होणार मदत
मोहाडी रस्त्यावरील महिला रुग्णालयात सध्या ऑक्सिजन बेडवर १० रुग्ण असून या ठिकाणी आता तपासणी देखील केली जाणार आहे. यासाठी या ठिकाणी कोविड सहायता केंद्र सुरू करण्यात येत आहे. १४ एप्रिलपासून त्याला सुरूवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. या ठिकाणी तपासणी करून रुग्णांना सल्ला दिला जाणार असून तेथे खाजगी डॉक्टरही मोफत सेवा देणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.