विम्याचे सर्वेक्षण आता कर्मचाऱ्यांमार्फत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:46 PM2019-11-20T12:46:45+5:302019-11-20T12:47:05+5:30
जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय ...
जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय विमा नियामक संस्था विचार करत असून याविरोधात अधिकृत सर्वेअर्संनी सोमवारपासून तीन दिवसांचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याअंतर्गत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.
भारतीय विमा नियामक संस्थे (आयआरडीए)ने अधिकृत सर्वेअर्संना डावलून कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा विचार सुरु केला आहे. एखाद्या मालमत्तेचा वा वस्तूचा विमा काढला आणि त्या वस्तूंचे नुकसान झाले तर यापूर्वी त्या त्या विमा कंपनीशी संबंधित अधिकृत सर्वेअरकडून त्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात होते. मात्र आता ते कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच करण्याचा विचार सुरु आहे. असे झाले तर मालमत्तेचे नुकसान आणि कर्मचाºयांनी केलेले मूल्यांकन यात तफावत आढळून ग्राहकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती या अधिकृत सर्वेअर्संनी व्यक्त केली आहे.
भारतीय विमा नियामक संस्था सर्वेअर्स नेमताना त्या त्या क्षेत्रातील पदवीधर व अनुभवी यांना परवाना देते. खासगी विमा कंपनीत काम करणाºया विमा कर्मचाºयांना कोणताच अनुभव नसताना ते मूल्यांकन कसे करू शकतात? असा सवाल या सर्वेअसर््ंनी केला आहे.
भारतीय विमा नियामक संस्थेचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून खाजगी विमा कंपन्यांच्या हिजाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे लोकांचा विमा क्षेत्रावरील विश्वास उडेल व विम्याची मूळ संकल्पनाच नष्ट होईल. यामध्ये बदल न झाल्यास सर्वेक्षकांची संघटना न्यायालयात जाईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.
देशात १५ हजार मान्यताप्राप्त सर्वेक्षक असून जळगाव व खान्देशात ३० सर्व्हेक्षक आहेत. हे सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रमोद पाटील, पी. के. राठी, शरद पाटील, राजेश झवर, यासेर अरफात, ललित मालपाणी, दिपक अट्रावलकर, अमोल पिंगळे यांनी कळवले आहे.