युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

By admin | Published: April 20, 2017 03:46 PM2017-04-20T15:46:20+5:302017-04-20T15:46:20+5:30

यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे.

The intact fort of Bhavnavastha, a seven-storey battle cry | युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणारा सातमाळ्यातील अंतूरचा किल्ला भग्नावस्थेकडे

Next

 ऑनलाईन लोकमत विशेष /संजय बी.सोनार  

नगरदेवळा ता.पाचोरा,दि.20 - निसर्गसौंदर्याने नटलेल्या सातमाळ्याच्या पर्वत रांगेत मोगल सत्तेचे जकातीचे ठाणे व नंतर यादवांच्या वैभवाची साक्ष देणारा तसेच युद्धशास्त्रीय महत्त्व सांगणार अंतुरचा किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची भग्नावस्थेकडे वाटचाल सुरु आहे. 
अंतूर किल्ला हा निजामशाहीच्या भरभराटीच्या काळात हे जकातीचे ठाणे होते. त्यानंतर देवगिरीच्या कृष्ण देवराव यादवांच्या कार्यकाळातील हा किल्ला अनेक पराक्रमांचा साक्षीदार आहे. मात्र आता किल्ल्याच्या आतील व बाहेरील ऐतिहासिक वास्तू भग्न झाली आहे. मध्यंतरी पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या अनेक भग्न वास्तुंची खांबांची भिंतींच्या डागडूजीचे प्रय} सुरू केले होते मात्र गेल्या दोन वर्षापासून ते कामही बंद आहे.
उत्तर व दक्षिण विभागांना जोडणारा किल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेला अंतूर किल्ल्याचा संपूर्ण पायाभूत इतिहास उपलब्ध नसला तरी निजामशाहीतील काळात उत्तर व दक्षिण विभागास जोडणारा तत्कालीन एकमेव रस्ता होता. तो रस्ता सातमाळ्याचा खडक फोडून कोरून तयार करण्यात आला होता. संपूर्ण सातमाळ्याच्या घनदाट अरण्याने व द:याखो:यांनी व्याप्त या एकमेव मार्गावर आवजावक करणा:यांकडून जकात वसूल करणे, चोर मार्गाने जाणा:यांकडून दंड वसुल करणे, यासोबतच शत्रूला रोखून वचक बसवणे, या सर्व दृष्टीने हे ठाणे अत्यंत उपयोगी ठरत होते. त्यामुळे निजामांनंतर यादवांनी रस्ता तयार करतांना निघालेल्या दगडांचाच वापर करूण अत्यंत खुबीने व स्वस्तात या किल्ल्याची उभारणी केली आहे.
काय आहे किल्ल्याचे महत्त्व
हा किल्ला उत्तरेकडून गिरीदुर्ग तर दक्षिणेकडून भूदुर्ग वर्गिकरणात येतो. समुद्र सपाटीपासून 2700फुट उंचीवर असलेला हा किल्ला गाठण्यासाठी नागदमार्गे नागापुर पयर्ंत 22 कि.मी.जावे लागते. तेथून गोपेवाडी कोलापूर असे सहा किलोमीटर अंतर कापून किल्ल्यावर पायी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. उत्तरेकडून खालून नागद व नगरदेवळा येथून दस्तापुर मार्गाने 17 कि.मी. अंतर असून वर पायी जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
किल्ल्याला बुरुजांची तटबंदी
किल्ल्यात जातांना पहिल्याच दक्षिणाभिमुख दरवाजातून आत डाव्या बाजूस चौकी आहे तर पायवाटेच्या वरच्या बाजूस बुरूजमाळ असून यातील एक तिहेरी बुरूज आहे. पुढे असलेल्या पुर्वाभिमुख भक्कम मांडणीच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेले बुरूज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानित शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा ठेवल्या आहेत तर दोन्ही बाजूस कमल पुष्पांसह पारशी भाषेतील शिलालेखही आढळतात. पुढे आतीलबाजूस संपूर्ण काळ्या खडकातील जिवंत गोड पाण्याचा झरा आहे. 
तलावाच्या काठावर मशिद उभारणी
तलावाच्या बाजूलाच असलेल्या मैदानातील मोठय़ा तलावाच्या काठावरच निजामशाहितील मशिद आहे. तलावाच्या समोरील उंच चौरश्यावर प्रचंड मोठे शस्नगार असून सरदारांच्या भात्यातील सर्व शस्र तेथे ठेवत असल्याचे तेथील मांडणीवरून दिसते. तसेच एका बुरूजावरून बाह्य टेहाळणी सह किल्ल्याच्या आतील संपूर्ण परिसराचे निरीक्षण करता येते. 
50 फुटांचा खंदक खोदून तयार केला मार्ग
 सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्याच्या मुख्य बुरूजाच्या समोरच्या पठाराचे अंतर 50 फुटांचे आहे. या किल्ल्यास शत्रू आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी 50 फुटांचा खंदक खोदुन डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे उत्तरेकडील खालच्या बाजूकडून पाहिल्यावर घनदाट वृक्षांनी वेढलेल्या डोंगरावर खडकांच्या वेष्टीत कडा भासतात. मात्र आतील टेहाळणी बुरूजांवरून खान्देशचा विस्तीर्ण पठारी प्रदेशावर लक्ष ठेवण्याबरोबरच शत्रूला वरूनच नेस्तनाबूत करता येत असल्याचे मांडणी वरून दिसते. दक्षिण बाजूकडून त्याच्या अगदी जवळ गेल्यानंतरही येथे भव्य किल्ला असल्याचे लक्षात येत नाही. यावरून किल्ल्याचे युद्धशास्रीय महत्व भौगोलीक व राजकीय महत्व लक्षात  येते.

Web Title: The intact fort of Bhavnavastha, a seven-storey battle cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.