भुसावळ येथे सेंट अलॉयसीस शाळेत बुुद्धिबळ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:40 PM2018-09-22T16:40:54+5:302018-09-22T16:41:51+5:30
विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक व मैदानी खेळाकडे वळावे : सिस्टर टेल्मा
भुसावळ, जि.जळगाव : आजकालची मुले लहानपणापासून मोबाइल, इंटरनेटचा वापर करत असून, यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो व बौद्धिक विकासही होत नाही. मुलांनी नेटचा वापर कमी करून मैदानी खेळाकडे वळावे, असे आवाहन सेंट अलॉयसीस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर टेल्मा यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या वेळी सांगितले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव, भुसावळ पंचायत समिती, भुसावळ आणि सेंट अलॉयसीस हायस्कूलतर्फे आंतरशालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
स्पर्धेचा निकाल : १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये पी.के.कोटेचा शाळेचा चेतन पाटील प्रथम आला, तर वेदांत शितोळे द्वितीय, तृतीय प्रेम बोरोले (दोन्ही के.नारखेडे विद्यालय), चतुर्थ आशमित चोरडिया व पाचवा युग जैन (दोन्ही सेंट अलॉयसीस) हे विजेते ठरले.
तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट अलॉयसीसीच्या गुर्मित कौर प्रथम, सायली नन्नवरे द्वितीय व आनंदिता ओक तृतीय आल्या.
स्पर्धा यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापिका सिस्टर सेल्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रमण भोळे, अशोक निकम, मधू वाणी, खंडेलवाल, नेमाडे, वरसगाव व मेघश्याम शिंदे यांनी परिश्रम घेतले.