अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 03:49 PM2019-02-06T15:49:57+5:302019-02-06T15:52:04+5:30

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

The intensity of intensity increased in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील ३३ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा२१ गावांना विहीर अधिग्रहणगुरांचे होताहेत हालस्वतंत्र टँकरची मागणीसध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र गुरांना पाणी अपूर्ण पडू लागल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वाढीव टँकरची मागणी केली आहे.
अमळनेर तालुक्यात अटाळे, पिंपळे बद्रूक, पिंपळे खुर्द, वाघोदा, निसर्डी, अंचलवाडी, डांगर बुद्रूक, भोरटेक मालपूर, धानोरा सबगव्हाण, शिरसाळे, झाडी, गलवाडे बुद्रूक, गलवाडे खुर्द, जैतपीर, खेडी, खरदे, वासरे, गडखांब, पिंपळी प्र.ज., आर्डी, अनोरे, भरवस, लोणपंचम, इंद्रापिंप्री, जानवे, धुपी, मांजर्डी, नगाव बुद्रूक, सुंदरपट्टी या गावांना पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर सुरू आहेत. या गावांसाठी सध्या अमळनेर पालिकेच्या मालकीच्या सिंधी कॉलनी भागातील विहिरीवरून व तापी नदी काठावरील धावडे या दोन गावनवरून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासह अजून २१ गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.
अमळनेर, कळमसरे, करणखेडा, ढेकूसीम, दहिवद खुर्द, रढावण राजोरे, सोनखेडी, तळवाडे, कुºहे बुद्रूक, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, एकतास, लोंढवे, पाडसे, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुद्रूक, नंदगाव, लाडगाव, खवशी, एकरुखी, लोण, चारम तांडा आदी गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र दररोज जमिनीची पाणी पातळी खालावत चालली असल्याने प्रस्तावांची संख्या वाढत आहे. खेडी प्र. ज. व शिरूड या दोन गावांचेही टँकर प्रस्ताव आलेले आहेत. काही गावांना गुरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
तरवाडे येथे विहीर अधिग्रहणाने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र गुरांसाठी स्वतंत्र टँकर मागतो, प्रशासन देत नाही. माणसे व गुरांसाठी तीन टँकर घेऊन विहीर अधिग्रहण बंद करा, असे सांगतात. मात्र अमळनेरचे पाणी पिण्यायोग्य नाही.
-रामकृष्ण पाटील, सरपंच, तरवाडे, ता.अमळनेर

सुंदरपट्टी येथे अद्याप टँकर सुरू झालेले नाही. परिसरातून नागरिक पाणी आणत आहेत. गोशाळेतर्फे गुरांसाठी दररोज पाच हजार लीटरचे टँकर येत आहे.
-सुरेश पाटील, सुंदरपट्टी, अमळनेर

नगाव बुद्रूक येथे मागील वेळी झालेल्या बंधारे व जलयुक्तची कामे केल्याने चिखली नदीत पाणी अडवण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी शेतीसाठी त्याचा उपसा केल्याने पाणी साठा संपला, अन्यथा ते पाणी किमान मेपर्यंत पुरले असते. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने उपसा थांबवण्यात येऊ शकला नाही.
-महेश पाटील, नगाव

सध्या सिंधी कॉलनी व धावडे येथून पुरवठा होत आहे. मात्र तापीचे आवर्तन सुटल्यास जळोद येथून व पांझरेतून आवर्तन सोडल्यास भिलाली, एकलहरे, कलंबू, बोदडे आदी ठिकाणाहून टँकर भरले जातील.
-अजयकुमार नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

Web Title: The intensity of intensity increased in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.