प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:31 PM2019-11-18T22:31:33+5:302019-11-18T22:31:58+5:30

जळगाव : गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. ...

Intentional conspiracy against plastic | प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र

प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र

Next

जळगाव : गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. मात्र धातू व इतर घटकांपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या क्षेत्रातील उद्योगांनी तयार केलेले हे षडयंत्र आहे असा आरोप ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी केला. मंदिची कोणीच चिंता करू नये, मंदित जो जिंकतो तो सिकंदर असतो, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबई येथे होणाºया ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनामागील हेतू व आयोजनासंदर्भातील भूमिका मांडण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे जळगावातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ त्या वेळी मुरारका बोलत होते.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, ‘जिंदा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे उपाध्यक्ष किशोर संपत आदी उपस्थित होते. संपत व मुरारका यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शनाची भूमिका व आयोजनाची माहिती दिली़ जळगावात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक उद्योग असल्याने प्लॅस्टिक उद्योगात जळगावचा मोलाचा वाटा असून येथील उद्योजक व्यापाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही दोघांनी केले़ या वेळी सचिन लढ्ढा, प्रशांत पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील, हरिष यादव, तुषार पटेल, सागर मनधान, रामदास कोळी, संदीप लाड, ओमप्रकाश सिंग, भुवनेश्वर सिंग, रवी फालक यांचा सत्कार करण्यात आला़

मुंबई येथे १६ ते २० जानेवारीदरम्यान ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ प्रदर्शन
प्लॅस्टिक उद्योगातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेची स्थिती या विषयी एकाच ठिकाणी माहिती होण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाचे १६ ते २० जानेवारीदरम्यान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रातील अडीअडचणींविषयी तज्ज्ञ उद्योजक मार्गदर्शनही करणार आहेत. या संदर्भात रविवारी जळगावात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका, उपाध्यक्ष किशोर संपत, जळगावचे प्रकल्प प्रमुख रवींद्र लढ्ढा, जळगाव प्लॅस्टिक रि-प्रोसेसिंग इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रदर्शन समितीचे समन्वयक विनोद बियाणी, लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी फालक, सचिव समीर साने, समन्वयक संतोष इंगळे उपस्थित होते. मुरारका यांनी सांगितले की, अशा प्रकारचे हे अकरावे प्रदर्शन असून ते मुंबई येथे बॉम्बे एक्सिबिशन सेंटर येथे होणार आहे.यात २५ देशातील दीड हजार उद्योजक सहभागी होणार आहे. या प्रदर्शनास युएफआय या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सर्वोच्च समितीसह भारत सरकारने मान्यता दिली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या प्रदर्शनासाठी देशभर ५०हून अधिक रोड आयोजित केले असून त्याद्वारे अडीच लाखाहून अधिक व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.

Web Title: Intentional conspiracy against plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.