जळगावात बनावट कागदपत्राद्वारे घराची केली परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:26 PM2018-11-11T12:26:18+5:302018-11-11T12:27:05+5:30

मास्टरमार्इंड शुभम पाटीलचा पुन्हा प्रताप

Interactive sale of house by fake documents in Jalgaon | जळगावात बनावट कागदपत्राद्वारे घराची केली परस्पर विक्री

जळगावात बनावट कागदपत्राद्वारे घराची केली परस्पर विक्री

Next
ठळक मुद्देआठ जणांना अटकदोन जण फरार

जळगाव : बनावट कागदपत्रे व व्यक्ती दाखवून रवींद्र प्रभाकर टिकले (वय ५०, रा.कानपुर, उत्तर प्रदेश) यांचे आदर्श नगरातील दोन मजली घर परस्पर दोन खरेदी खत तयार करुन विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मास्टर मार्इंड ब्रोकर शुभम सुनील पाटील याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयाने १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदर्श नगरातील आदर्श को-आॅप हौसिंग सोसायटीतील रहिवाशी रवींद्र टिकले हे नोकरीनिमित्त कानपूर, उत्तर प्रदेश येथे स्थायिक आहेत. नवीन सीटी सर्व्हे क्र. ५८१९/७१७/१ मधील क्षेत्र २७० चौरस मीटर व तळ मजला आणि पहिला मजला यांचे एकूण क्षेत्र १८२.८८ चौरस मीटर इतकी मालमत्ता टिकले याचे वडील प्रभाकर शंकरराव टिकले (वय ६७)यांच्या नावावर आहे. ही मालमत्ता ब्रोकर शुभम सुनील पाटील (रा. स्वामी नारायण मंदिराजवळ, जळगाव) याने प्रभाकर टिकले यांच्या जागी प्रल्हाद बिसन परदेशी (रा.विटनेर, ता. जळगाव) यांना बनावट मालक दाखवून दुय्यम निबंधक-२ यांच्या कार्यालयात उभे केले. तेथे बनावट फोटो, वाहन परवाना व इतर कागदपत्रांच्या नकला सादर केल्या व सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव (वय २९, रा.कासमवाडी, जळगाव) याला खरेदी करुन दिली. साक्षीदार म्हणून गौरव घनश्याम तिवारी (वय २७, रा.शिवाजी नगर, जळगाव) व दयावान गौतम सोनवणे (रा.रामदास कॉलनी, जळगाव) यांना उभे केले. ही खरेदी २८ जून २०१८ रोजी झाली.
दुसरे खरेदीखत रत्नकांत सिध्दार्थ भालेराव (वय २२, रा.कासमवाडी, जळगाव) व प्रकाश सखाराम पाटील (वय ४६, रा.कासमवाडी, जळगाव) या दोघांना खरेदी करुन दिले. या ठिकाणीही प्रभाकर टिकले यांच्याजागी प्रल्हाद परदेशी यालाच उभे करण्यात आले होते. यात साक्षीदार म्हणून नरेंद्र रघुनाथ मगरे (रा.विठ्ठल पेठ, जळगाव) व रवींद्र अशोक भोई (वय ३०, रा.मेहरुण, जळगाव) यांना उभे करण्यात आले होते. एकाच दिवशी दोन्ही खरेदीखत झाले. दरम्यान, याच प्रकारे फसवणूक केल्याचा शुभम याच्यावर याआधी रामानंद नगर व जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुहा दाखल आहे.
असा झाला भंडाफोड
आदर्श नगरातील आदर्श को आॅप हौसिंग सोसायटीतील प्रभाकर टिकले यांच्या घरात सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव हा वास्तव्याला गेला होता. रवींद्र टिकले यांचे मित्र भगवान पारखे यांनी चौकशी केली असता हे घर विकत घेतल्याचे भालेराव याने सांगितले. त्यानुसार पारखे यांनी ही माहिती टिकले यांना दिली. घर कोणालाही विक्री केलेले नसताना आपल्या घरात रहिवाशी कसे आले या प्रश्नाने टिकले यांना धक्का बसला. त्यांनी ही माहिती हरीद्वार येथे राहणारे मोठे भाऊ दीपक यांना दिली. दोघांनी जळगावकडून रहिवाशी भालेराव याच्याकडून माहिती घेत दुय्यम निबंधक कार्यालयातून नकला काढल्या असता बनावट कागदपत्रे व बनावट व्यक्ती दाखवून घराची खरेदी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार दाखल
आदर्श नगरातील आदर्श को आॅप हौसिंग सोसायटीतील प्रभाकर टिकले यांच्या घरात सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव हा वास्तव्याला गेला होता. रवींद्र टिकले यांचे मित्र भगवान पारखे यांनी चौकशी केली असता हे घर विकत घेतल्याचे भालेराव याने सांगितले. त्यानुसार पारखे यांनी ही माहिती टिकले यांना दिली. घर कोणालाही विक्री केलेले नसताना आपल्या घरात रहिवाशी कसे आले या प्रश्नाने टिकले यांना धक्का बसला. त्यांनी ही माहिती हरीद्वार येथे राहणारे मोठे भाऊ दीपक यांना दिली. दोघांनी जळगावकडून रहिवाशी भालेराव याच्याकडून माहिती घेत दुय्यम निबंधक कार्यालयातून नकला काढल्या असता बनावट कागदपत्रे व बनावट व्यक्ती दाखवून घराची खरेदी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार दाखल७० लाखात झाला व्यवहार
मालमत्ता खरेदी करताना ७० लाखात व्यवहार झालेला आहे. त्यातील ५० लाख रुपये रोख तर २० लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले आहे. ब्रोकर शुभम पाटील याने २० लाखाचे कोरे धनादेश घेऊन ते नंतर स्वत:च्या नावाने बॅँकेत वटविले आहेत. सूर्यकांत, रत्नकांत या दोन्ही भावंडासह प्रकाश सखाराम पाटील याच्याकडून शुभमने कोरे धनादेश घेतले आहेत. तसेच शुभम, प्रल्हाद परदेशी व राजेश बसेर यांना २०१४ ते २०१८ या कालावधीत वेळोवेळी रोखीने ५० लाख रुपये दिलेले आहेत.
आठ जणांना अटक, दोन जण फरार
या गुन्ह्यात सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव, रत्नकांत सिध्दार्थ भालेराव, प्रकाश सखाराम पाटील, रवींद्र अशोक भोई, गौरव घनश्याम तिवारी, शुभम सुनील पाटील, प्रल्हाद बिसन परदेशी व राजेश बाळकृष्ण बसेर या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्या.एम.एम.चौधरी यांनी १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नरेंद्र रघुनाथ मगरे व दयावान गौतम सोनवणे यांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्यात सरकारतर्फे अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.केदार भुसारी, अ‍ॅड.प्रदीप देशमुख, अ‍ॅड.पावसे व अ‍ॅड.अमोल पाटील यांनी काम पाहिले.७० लाखात झाला व्यवहार
मालमत्ता खरेदी करताना ७० लाखात व्यवहार झालेला आहे. त्यातील ५० लाख रुपये रोख तर २० लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले आहे. ब्रोकर शुभम पाटील याने २० लाखाचे कोरे धनादेश घेऊन ते नंतर स्वत:च्या नावाने बॅँकेत वटविले आहेत. सूर्यकांत, रत्नकांत या दोन्ही भावंडासह प्रकाश सखाराम पाटील याच्याकडून शुभमने कोरे धनादेश घेतले आहेत. तसेच शुभम, प्रल्हाद परदेशी व राजेश बसेर यांना २०१४ ते २०१८ या कालावधीत वेळोवेळी रोखीने ५० लाख रुपये दिलेले आहेत.
आठ जणांना अटक, दोन जण फरार
या गुन्ह्यात सूर्यकांत सिध्दार्थ भालेराव, रत्नकांत सिध्दार्थ भालेराव, प्रकाश सखाराम पाटील, रवींद्र अशोक भोई, गौरव घनश्याम तिवारी, शुभम सुनील पाटील, प्रल्हाद बिसन परदेशी व राजेश बाळकृष्ण बसेर या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्या.एम.एम.चौधरी यांनी १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नरेंद्र रघुनाथ मगरे व दयावान गौतम सोनवणे यांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्यात सरकारतर्फे अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.केदार भुसारी, अ‍ॅड.प्रदीप देशमुख, अ‍ॅड.पावसे व अ‍ॅड.अमोल पाटील यांनी काम पाहिले.

 

Web Title: Interactive sale of house by fake documents in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.