रक्कम भरल्यानंतर अनिल चौधरींना अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:01+5:302021-05-28T04:14:01+5:30
एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याचा चौधरींवर आरोप असून, यासंदर्भात ...
एका महिलेकडून ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याचा चौधरींवर आरोप असून, यासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (३१/२१) दाखल आहे.
रक्कम भरल्यानंतरच मिळाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
गाळे खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल चौधरी यांनी भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर खंडपीठात दाद मागण्यात आली होती. मात्र तेथे दिलासा न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी फसवणूक झालेल्या प्रकरणात आधी भुसावळातील दिवाणी न्यायालयात ६० लाख ७० हजार रुपये रक्कम जमा करावी व त्यानंतर म्हणणे ऐकले जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रक्कम भरण्यात आली होती व पैसे भरण्यात आल्याचे कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होऊन दोन आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला व पोलिसांनी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातील न्या. दिनेश माहेश्वरी व न्या.अनिरुद्ध बोस यांनी दिले आहेत. या प्रकरणात आता सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.