जळगावात मालाच्या परस्पर विल्हेवाटीचा प्रय} फसला

By admin | Published: July 17, 2017 12:45 PM2017-07-17T12:45:35+5:302017-07-17T12:45:35+5:30

पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत, मात्र मुळ कंपनीतून माल घेऊन निघालेला ट्रक व त्याचा चालक गायब आहे

Intermittent disposal of Jalgaon goods} | जळगावात मालाच्या परस्पर विल्हेवाटीचा प्रय} फसला

जळगावात मालाच्या परस्पर विल्हेवाटीचा प्रय} फसला

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 17 - पॉलिस्टर व सिन्थेटीकचे धागे बनविण्यासाठी लागणारे 25 लाख रुपये किमतीचा कापसाचा कच्चा माल (गाठी) नागपूर येथील कंपनीत न पोहचविता मध्येच त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रय} एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला आहे. हा माल एका ट्रकमधून दुस:या ट्रकमध्ये टाकून विल्हेवाट लावली जात होती. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले आहेत, मात्र मुळ कंपनीतून माल घेऊन निघालेला ट्रक व त्याचा चालक गायब आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्री भागीरथ टेक्सटाईल्स लि.कोहळी, ता.कळमेश्वर जि.नागपूर या कंपनीत कापसापासून पॉलिस्टर व सिन्थेटीकचे धागे बनविण्याचे काम चालते, त्यासाठी लागणारा ‘व्हीस्कोप स्टेबल फायबर’ हा कच्चा माल (गाठी) ग्रासिम सेल्युलॉसीक डिव्हीजन, विलायत इंडस्ट्रीयल, पो.विलायत, जि.भरुच (गुजरात) येथून ट्रकद्वारे मागविण्यात येतो. यावेळी 25 लाख 15 हजार 378 रुपये किमतीचा हा माल मागविला होता, मात्र तो श्री भागीरथ टेक्सटाईल्स या कंपनीत पोहचलाच नाही. या कंपनीने 28 जून रोजी ग्रासिम सेल्युलॉसीक डिव्हीजन या कंपनीकडून माल विकत घेतला. त्यासाठीची रक्कमही अदा करण्यात आली होती. ग्वालीयर ट्रान्सपोर्ट, उज्जैन यांचा ट्रक (क्र.सी.जी. 04,जे.बी.1479) हा माल नागपूरकडे निघाला. 1 जुलैर्पयत हा माल कंपनीत पोहचणे आवश्यक असताना तो 5 जुलैर्पयत पोहचलाच नाही. त्यामुळे टेक्सटाईल्सचे व्यवस्थापक प्रकाश मंडलिक यांनी ग्वालीयर ट्रान्सपोर्टचे मालक राजेश श्रीनिवास यांच्याशी संपर्क करुन ट्रक अद्याप माल घेऊन पोहचला नसल्याचे सांगितले, त्यावर श्रीनिवास यांनी प्रित गुड्स कॅरिअर ट्रान्सपोर्टमार्फत माल भरुन पाठविलेला आहे व या ट्रकचे मालक भुमिंदरसिंग मनजितसिंग माकन (रा.नागपूर) यांच्याशी तुम्ही संपर्क करा असा सल्ला त्यांनी दिला.उपनिरीक्षक रोहन खंडागळे, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, सचिन मुंडे, अशरफ शेख व गोविंदा पाटील यांच्या पथकाला अजिंठा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर ट्रक क्र.(एम.एच.04, सी.यु.208) व ट्रक (क्र.एम.एच.04 सी.यु.9860) संशयास्पदरित्या आढळून आले. तेथे असलेला चालक तस्लीमखान अयुब खान (रा.पाळधी, ता.धरणगाव) व फिरोजखान जाफर उल्लाखान (रा.गिट्टी खदान, नागपूर) या दोघांची चौकशी केली असता पोलीस असल्याचे लक्षात येताच फिरोजने तेथून पळ काढला, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पथकाने ही माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना दिली. कंपनी मालक व ट्रक मालकाला मुंडे यांनी माहिती कळविली, त्यानुसार चौघे रविवारी सकाळी जळगावात दाखल झाले.

Web Title: Intermittent disposal of Jalgaon goods}

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.