भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:36 PM2020-05-03T16:36:55+5:302020-05-03T16:37:47+5:30

लॉकडाऊनच्या काळात प्राध्यापकांना आपापल्या घरात बौध्दिक मेजवानी मिळावी या उद्देशाने कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे रविवारी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

International Webinar by Kotecha Women's College, Bhusawal | भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार

भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार

Next
ठळक मुद्देविविध देशातील दोनशेवर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांचा सहभागप्रा. डॉ. गिरीश कोळी यांचा यशस्वी प्रयोग

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक कार्य सुरूच रहावे आणि प्राध्यापकांना आपापल्या घरात बौध्दिक मेजवानी मिळावी या उद्देशाने येथील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे रविवारी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यात विविध देशातील विविध भागातील दोनशेवर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, आज जगाच्या परिस्थितीचा विचार करताना असे लक्षात येते की भविष्यात संगणक आणि त्यावरील अंतर्गत नेटवर्क खूप महत्त्वाचे आहे. हे नेटवर्क मानवी जीवनातील बऱ्याच उपक्रमांसाठी अतिशय योग्य असल्याचे सिद्ध होणार आहे. आज ना उद्या आम्हाला या उपकरणाच्या उपयोगितांशी जोडणे बंधनकारक असेल. भविष्यातील आवश्यकतांच्या दृष्टिकोनातून या वेबिनारचे आयोजन केले आहे. आमच्या महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील आॅनलाईन चर्चेचा हा पहिला प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी प्रा.डॉ. मधु खराटे यांनी केले. वेबिनारसंबंधी त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, हिंदी साहित्यात विविध विमर्श समोर आले असून, त्यामध्ये स्त्री विमर्श, दलित विमर्श, आदिवासी विमर्श व किन्नर विमर्श आहे. विमर्श म्हणजे समाजातील जो वर्ग अतिमागास आहे त्यावर समाजाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी लेखक साहित्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. साहित्य संवदेना प्रकट करण्याचे उत्तम साधन आहे. साहित्यकारांचा प्रमुख उद्देश समाजातील उपेक्षित घटकांना नवीन प्रवाहात आणण्याचा आहे.
टोकियो यूनिवर्सिटी आॅफ फॉरेन स्टडीज, टोकियो, जापान येथील डॉ. श्याम सुंदर पांडे यांनी आपल्या बीज भाषणामध्ये जागतिक स्तरावरील हिंदी साहित्य आणि विमर्श यांची संकल्पना मांडली. यामध्ये त्यांनी साहित्यातील नारी विमर्श, दलित विमर्श, आदिवासी विमर्श, किन्नर विमर्श, अल्पसंख्यान विमर्श, वृध्द आणि विकलांकग विमर्श विषयाची माहिती दिली. विमर्श साहित्य सर्जना निमार्ण करण्यास प्रेरणा ठरते. विविध विमर्शांच्या माध्यमातून समस्या निवड करून उपयायोजना करण्यास कारणीभूत ठरते.
बुलंद शहर, उत्तर प्रदेश येथील डॉ. विजेंद्र प्रताप सिंह यांनी भारतीय साहित्यामध्ये किन्नर विमर्शचे विविध संदर्भ देताना सांंिगतले की, समाजात असा एक घटक आहे की जो आजही समाजातील मुख्य प्रवाहामध्ये येवू शकला नाही. समाजामध्ये वावरताना आपणास विविध घटना दिसतात व साहित्यकार त्या घटनांचा आधार घेवून यर्थाथ व कल्पनेचा आधार घेवून सहित्य निर्मिती करतात. किन्नर समुदायासाठी आज कायदे तयार करण्यात आले असून, त्यांचे पालन करताना खूप कमी ठिकाणी पहायला मिळते. किन्नर म्हणून आपलेच आई व वडिल त्याला वाळीत टाकतात. त्यांनी विविध पुस्तकांचे उदाहरण देवून किन्नर समुदायची व्यथा मांडली.
मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील डॉ.दत्तात्रय मुरूमकर यांनी दलित विमर्श या विषयांवर म्हणाले, समाजातील दलित हा असा एक घटक आहे की त्याला प्रवाहात आण्ण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.
राजपपिपला, गुजरात येथील डॉ. हितेश गांधी यांनी आदिवासी विमर्श या विषयावर चर्चा करताना त्यांनी आदिवासी समाजाचे जीवन दर्शन घडविले. समाजामध्ये आजही आदिवासी समाज पूर्णपणे प्रवाहात येवू शकलेला नाही. शासनाच्या विविध योजना आदिवासी वगार्साठी मंजूर केल्या जातात पण शेवटर्यंत योजना येत नाही. हे सर्व साहित्याच्या माध्यमातून समाजापुढे मांडले जाते आणि शेवटी प्रसारमाध्यम व सरकारला जाग येवून कार्यवाही केली जाते. अशा कित्येक आदिवासी जमातींना आपल्या मूळ स्थानापासून हाकलून लावले जाते व जंगले नष्ट केले जाते. खरा आदिवासी जंगलाचे संरक्षण करतो पण शेवटी आदिवासींची अवहेला समाजामध्ये आजही मोठया प्रमाणावर दिसून येते.
महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. जिजाबराव पाटील यांनी समारोपात विचार मांडले की, हिंदी क्षेत्रातील अांतरराष्ट्रीय स्तरावरील ही पहिलेच वेबिनार असून पूर्णपणे नियोजनबध्द पध्दतीने पार पाडण्यात आले. देशातील विविध क्षेत्रातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
सूत्रसंचालन व आभार धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचे प्राध्यापक व सह-समन्वयक डॉ.विजय सोनजे यांनी केले. कार्यक्राची धूरा कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश एस. कोळी यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्षा पद्मा कोटेचा, पदाधिकारी, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्या डॉ.शिल्पा पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही. धनवीज, सह-समन्वयक प्रा.नीलेश गुरूचल, डॉ.संजयकुमार शर्मा, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: International Webinar by Kotecha Women's College, Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.