आंतरजातीय प्रेमविवाह करणा-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:24+5:302021-05-22T04:16:24+5:30
पोलीस अधीक्षकांची घेतली भेट : तक्रारीची दखल घेऊन कारवाईचे आदेश फोटो : ९.३१ वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क ...
पोलीस अधीक्षकांची घेतली भेट : तक्रारीची दखल घेऊन कारवाईचे आदेश
फोटो : ९.३१ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आंतरजातीय विवाह केल्याने प्रेमी युगुल जोडप्याला कुटूंबीयांनी ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत दाम्पत्याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, कारवाई होत नसल्यामुळे वारंवार धमक्या मिळत असल्यामुळे अखेर शुक्रवारी जोडप्याने पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी रामानंद नगर पोलिस निरीक्षकांना दिले.
महाबळ येथील अमोल रमेश पंडित या युवकाशी ६ एप्रिल रोजी अंजली यादव या युवतीचा वैदिक पध्दतीने प्रेमविवाह झाला. ती महाबळ परिसरातचं राहत होती. दोघांचे प्रेम जुळल्यानंतर त्यांनी विवाह केला. विवाह झाला त्याच दिवशी अंजलीचे वडील रामपदारथ यादव यांनी मुलगी हरवल्याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. मात्र, चौकशीअंती जबाबानंतर तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर अंजलीचा चुलत भाऊ अनिल व सख्खा भाऊ विनय यादव यांच्यासह इतरांनी सुभाष चौक पोलीस चौकीजवळील दुकानाजवळ येऊन शिविगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत अमोलचा भाऊ दिनेश पंडित याने अर्ज दिलेला आहे. लग्नाचा उपस्थित असलेले साक्षीदार प्रदीप दुबे, रवींद्र शिरसाळे यांनाही त्या जोडप्याचा पत्ता न सांगितल्यास धमकी देण्यात आली. त्याचप्रमाणे अंजली व अमोल जेथे दिसतील, तेथे त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात पुन्हा २४ एप्रिल रोजी हजर राहून जबाब नोंदविले. मात्र, भावांकडून पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे.
हात जोडत कारवाईची केली मागणी
दरम्यान, रामानंद नगर पोलिसात तक्रार देऊनही धमकी देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे अंजली व अमोल या जोडप्याने शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. परंतु, पोलीस अधीक्षक पोलीस मल्टीपर्पज हॉलमध्ये पोलिसांच्या रक्तदान शिबिरात असल्याची माहिती जोडप्याला मिळाली. त्यांनी मल्टीपर्पज हॉल गाठत, पोलीस अधीक्षक अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेतली. आंतरजातीय प्रेमविवाहानंतर दिल्या जात असलेल्या धमक्यांबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यांची तक्रार ऐकून घेत पोलिस अधीक्षकांनी रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना त्यांच्या तक्रारीवरुन कारवाई करण्याचे आदेश दिले.