जुलैत बाधित आणि डेमोत पहिला क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:46+5:302021-01-09T04:12:46+5:30
नंबर होता दुसऱ्याच कर्मचाऱ्यांचा नोंदणीनुसार एनआरएचएम विभागाचे राकेश पाटील यांचा पहिला क्रमांक होता. मात्र, पालकमंत्री अचानक आल्याने गोंधळात गोंधळ ...
नंबर होता दुसऱ्याच कर्मचाऱ्यांचा
नोंदणीनुसार एनआरएचएम विभागाचे राकेश पाटील यांचा पहिला क्रमांक होता. मात्र, पालकमंत्री अचानक आल्याने गोंधळात गोंधळ आणि मिलिंद काळे हे कामानिमित्त आत गेले आणि त्यांचा पहिला नंबर लावून हा डेमो देण्यात आला. नियोजनला उशीर झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
शिवाजीनगरला यांची होती उपस्थिती
शिवाजीनगरच्या डी. बी. जैन रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ड्राय रन पार पडला. आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी पाहणी केली. यात रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सायली पवार, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नेहा भारंबे, डॉ. संजय पाटील, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी नारखेडे, प्रमुख परिचारीका उर्मीला भीरूड, सुरेखा मेठे, सरला कटरे, सुनीत गुरचळ आदींनी ही प्रक्रिया पार पाडली.